शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी हनुमान जन्मोत्सव २०२६: कलियुगात स्वामी-हनुमान सेवा काळाची गरज; नेमके काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:46 IST

Guruwari Hanuman Janmotsav 2026: गुरुवारी हनुमान जन्मोत्सव असून, स्वामी आणि मारुतीरायाची सेवा कशी करावी? जाणून घ्या...

Guruwari Hanuman Janmotsav 2026: कलियुगात संकटे गळ्यापर्यंत आली की मनुष्य कुठल्यातरी शक्तीचा आधार घेतो आणि त्यास शरण जाऊन नतमस्तक होतो. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात प्रत्येकाचा संयम संपलेला आहे किंवा संपत चाललेला आहे. संयम हवा आणि संयमाचा उगम हा नामातून होत असतो. गुरुतत्व समजणे महत्वाचे आहेत. गुरूंची नावे वेगवेगळी असली तरी गुरु हे एक तत्व आहे. आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची सेवा करावी. कुठल्याही अपेक्षेविरहित आत्यंतिक ओढीने प्रेमाने घेतलेले त्यांचे नाव निश्चित त्यांच्या पर्यंत पोहोचणार. गुरु हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे.

सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपला अंतरात्मा, आपला आतला आवाज, आपले मन काहीही म्हणा. अनेकदा आपण म्हणतो तुझा आतला आवाज काय सांगतो ते ऐक आणि तेच गुरुचे सूक्ष्म रुप आहे. गुरु आपल्या अवती भवतीच आहे, आपलाच एक भाग आहे. आपण उपासनेसाठी नाही . उपासना आपले आयुष्य समृद्ध करते . जिथे राम तिथे राम आणि राम आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठीच उपासना आहे. 

फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार

नाम आपल्याला संयमित करते. मन शांत होते. नाम सकारात्मकता देते. नाम हे जीवनातील जादूच्या कांडी सारखे काम करते . नामाची महती ते घेतल्याशिवाय समजणार नाही. आपण घेत असलेले नाम किंवा मंत्र हा गुरूंच्या आज्ञेशिवाय सिद्ध होत नसतो . मंत्राचे विलक्षण परिणाम अनुभवायला येणे हेही त्यांच्याच हाती असते. आपण मनापासून नाम घ्यायचे मंत्र म्हणायचे फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार. त्यामुळेच गुरुवारी स्वामींच्या मंत्राचा जप अवश्य करावा. ‘श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र किमान १०८ वेळा तर जपावा. तसेच स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा. बाकी काही सेवा जमली नाही, तर सदर सेवा करून स्वामींना मनापासून नमस्कार करावा.

हनुमान जन्मोत्सव २०२६ ला काय कराल?

राहु केतुला आवर घालण्यासाठी आणि शनि कृपा मिळवण्यासाठी हनुमान चालिसा हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे. रामाचा जप करून हनुमान चालिसा नित्य म्हटली तर आश्चर्यकारक परिणाम आणि अनुभूती मिळते. कुठलाही विचार न करता हनुमान चालिसा, शनिचा जप अखंड करा त्याआधी आपल्या कुलस्वामिनीचा जप आणि सद्गुरू स्वामी समर्थांचा जप करावा. आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल , प्रत्येक पहाट सुखाची असेल . शनि प्रत्येक गोष्ट विलंब करतो पण देणार नाही, असे कधीच म्हणत नाही . संयम शिकवतो. प्रतीक्षेनंतरचा प्रत्येक क्षण मात्र आनंद सौख्य भरभराट घेऊन येणार आहे.

अहंकार आयुष्याची माती करतो

शनिला तेलाचा अभिषेक, हनुमानाला रुईचा हार, शेंदूर अर्पण करायचाच आहे, पण त्याही पेक्षा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पायावर आपला अहंकार समर्पित करायचा. अहंकार आयुष्याची माती करतो आणि ज्याला माज अहंकार आहे त्याला शनिची अत्यंत कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही . आता प्रत्येकाने ठरवायचे की, काय समर्पित करायचे, काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे.

श्री स्वामी समर्थ

॥ बजरंगबली की जय ॥

॥ जय श्रीराम ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hanuman Janmotsav 2026: Importance of Swami-Hanuman Seva in Kalyug

Web Summary : In Kalyug, surrendering to a higher power is vital. Name chanting brings peace, while serving gurus selflessly yields benefits. Recite Hanuman Chalisa for Rahu-Ketu relief and chant Swami Samarth mantras regularly, offering ego at Hanuman's feet.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण