शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

गरुड पुराणानुसार कोणते दान सर्वश्रेष्ठ फलदायी आहे, हे जाणून घ्या.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 20, 2021 16:45 IST

ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे, ते देत राहा. त्याने आनंद वाढतो. आपलाही आणि समोरच्याचाही! जे कमावलं आहे, ते इथेच ठेवून जायचे आहे. जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा, हाच दानाचा पवित्र हेतू!

सतत घेत राहणाऱ्या हाताला देण्याची सवय लागायला हवी, म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदाद करू नये. म्हणतात ना, 'नेकी कर और दर्या मे डाल!' 

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

दानाच्या विविध प्रकाराचे आणि त्यामुळे मिळणाऱ्या फळाचे वर्णन गरुड पुराणात दिले आहे. त्यानुसार-

न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी. आणि स्वकमाईवर दानधर्म करावा. जे दान योग्य माणसाला दिले जाते, त्याला सात्विक दान म्हटले जाते. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि विमल हे दानाचे प्रकार होत.

कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणालाही शक्य असेल, ते दान जो रोज देतो, त्याला नित्य दान म्हणतात.

पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवणयासाठी जे दान दिले जाते, त्याला नैमित्तिक दान म्हणतात.

संतति, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते, त्याला काम्य दान म्हणतात.

परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्त्वसंपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमल दान असे म्हणतात.

दानाच्या प्रकारानुसार त्याचे फळ पुढीलप्रमाणे प्राप्त होते- 

  • जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो. 
  • अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो. 
  • तीळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो. 
  • दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो. 
  • भूमीदान करणारा सर्व पदार्थांची सौख्य प्राप्त करतो. 
  • सोने दान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो. 
  • चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो. 
  • अंथरूण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो. 
  • अभय दान देणारा ऐश्वर्य प्राप्त करतो. 
  • धान्य दान देणारा चिरसौख्य प्राप्त करतो. 
  • विद्या दान देणारा स्वर्गप्राप्ती करतो. 
  • गायीला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो. 
  • सरण दान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो.
  • दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो, त्याला परमसौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 
  • मात्र, जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असूनसुद्धा गरजवंतांना देत नाही, तो पापाचा भागीदार होतो. 

थोडक्यात काय, ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे, ते देत राहा. त्याने आनंद वाढतो. आपलाही आणि समोरच्याचाही! जे कमावलं आहे, ते इथेच ठेवून जायचे आहे. जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा, हाच दानाचा पवित्र हेतू!

चाहे समजलो पैसे को हिरे या मोती, जानलो एक बात, कफन पर जेब नही होती।

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज