शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वयावर मात करण्यासाठी 'हा' मानसशास्त्रीय तोडगा जरूर वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:54 IST

हा तोडगा आजच्या काळात तरुणांनाही अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्यांनी ही जादूची कांडीच आहे असे समजावे!

वय वाढत जाते तसे आपण केवळ शरीराने नाही तर मनानेही पोक्त होत जातो. किंबहुना आपण जितक्या लवकर मनाने पोक्त होतो, तितक्या वेगाने शरीराने पोक्त होत जातो. जे लोक मनाने तरुण राहतात ते ऐंशीच्या घरात पोहोचले तरी वृद्ध वाटत नाहीत. असा उत्साहाचा झरा बनायचे असेल तर मानसशास्त्राचा तोडगा तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आजमावून पाहता येईल. 

ज्यांचे वय पन्नाशीच्या पुढे आहे त्यांनी आपण आपल्या खऱ्या वयापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान आहोत असा नित्य विचार करावा. वरकरणी तुम्हाला या उपायात काहीच तथ्य नाही असे वाटेल. परंतु जेव्हा तुम्ही मनापासून हा प्रयोग सुरू कराल, तेव्हा आपोआपच तुम्हाला त्याची प्रचिती येईल. 

यामागील मानसशास्त्रीय कारण जाणून घेऊ. आपल्या आयुष्याचा सुमारे एक चतुर्थांश भाग झोपण्यात जातो. या झोपेच्या कालावधीत देहविस्मृती होते. आपल्या वयातून हा देह विस्मृतीचा काळ वजा केला, तर आपल्याला आताच्या वयापेक्षा दहा बारा वर्षे कमी वय मिळेल. हेच आपले खरे वय आहे, असे मानून त्यानुसार तुमच्या ध्येयाप्रती किंवा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाप्रती आचरण सुरू करा. 

तसे केल्यामुळे कर्तबगारी करण्यास हुरूप येईल. देहावर आरोग्याचे तेज दिसू लागेल. वृद्धापकाळ सुरू होताच लोक हे जग कधीही सोडून जावे लागेल अशा आविर्भावात दु:खी, कष्टी राहू लागतात. सरकारने सेवानिवृत्त ठरवले की लोक आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागू लागतात. यावर हा उपाय प्रभावी ठरतो. 

हा तोडगा आजच्या काळात तरुणांनाही अतिशय उपयुक्त ठरू शकतो. वाढलेले वय, अपूर्ण स्वप्ने, विवाहास विलंब, आर्थिक अडचणी आणि रोगराईमुळे त्रस्त झालेला आजचा तरुण प्रचंड नैराश्याचे जीवन जगत आहे. त्याला वाटते, जादुची कांडी फिरावी आणि मागची दहा वर्षे परत मिळावी. मानसशास्त्राने ही कांडी आपल्याच हातात असल्याचे म्हटले आहे. 

मनामध्ये प्रचंड सामथ्र्य असते. आपण ते आजमावत नाही. परंतु एकदा का एखादी गोष्ट मनाने घेतली, की ध्येयपूर्ती झाल्याशिवाय मन स्वस्थ बसू देत नाही. अशा मनाला उभारी देण्यासाठी आपल्या वास्तवातील वयापेक्षा दहा वर्षे मागे जाण्याची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाढत्या वयावर शरीरावर मात करता आली नाही, तरी मनाने आमरण चीरतरुण जगता येते. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य