Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:13 IST2025-06-11T12:13:12+5:302025-06-11T12:13:51+5:30

Astrology: Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ९

Astrology: There must be yoga in the horoscope for falling in love, falling out of love, and even for a successful love marriage! | Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!

Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आयुष्यात प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करणारे कुणीतरी आहे ही भावना जीवन जगायला पुरेशी आहे. असे प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत अखंड आयुष्य एकत्र घालवणे हा ईश्वरी आशीर्वादच आहे . प्रेम कुणावर होईल सांगता येणार नाही . स्वतःच्या जातीतील प्रेम विवाहाला अनेकदा कटकटी किंवा विरोध होतो, तर आंतरजातीय किंवा अधर्मीय विवाहाला कशा प्रतिक्रिया असतील ह्याचा विचार होणे आवश्यक आहे.  

Astrology: पुनर्विवाह केला तरी तो यशस्वी होण्याचा योग पत्रिकेत असावा लागतो, अन्यथा... 

राहू केतू  परजातीत सुद्धा विवाह करवतात. तसेच शनी हा विजोड जोडीदार देतो. प्रेमाचा ग्रह हा शुक्र आहे .चंद्र, नेपच्यून हेही स्त्रीग्रह असल्यामुळे त्यांचा विचार करावा. स्थानांचा विचार केला तर ५, ७, ९ आणि लग्नस्थान ही स्थाने प्रेम विवाहासाठी पोषक असतात . वृषभ ,तूळ , मिथुन ,कर्क ,वृश्चिक आणि मीन ह्या राशी चा विचार केला पाहिजे.  पत्रिकेत चंद्र राहू , शुक्र राहू ,सप्तमेशाबरोबर राहूची युती असेल तर आंतरजातीय प्रेम विवाह होऊ शकतो.  शुक्रासोबत राहू किंवा केतू असेल तर रूढीबाह्य विवाहाकडे कल राहील. सप्तमेश ,सप्तम स्थानातील ग्रह आणि शुक्र जर राहू किंवा केतूच्या ,शनिच्या नक्षत्रात असतील. सप्तम स्थानात चंद्र शुक्र मंगळ हे ग्रह असतील आणि ते राहू केतू शनी ह्यांच्या युतीत असतील. सप्तमेश शनी पंचम स्थानात किंवा सप्तम स्थानात शुक्र राहू युती असेल तर. पंचमेश , सप्तमेश किंवा भाग्येश ह्यांचे मालक राहू केतूच्या युतीत असून  ५, ७, ९, १ ह्या स्थानात असतील तर प्रेम विवाहाची शक्यता असते.

प्रेम ही निसर्गाची देणगी आहे, तसेच भिन्नलिंगी आकर्षण हे सुद्धा नैसर्गिक आहे. तरुणपणात कुणीतरी आपल्याला आवडते तसेच कुणालातरी आपण आवडावे ह्या भावना मनात निर्माण होतात .आज मुले मुली ह्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे आर्थिक स्तरसुद्धा उंचावला आहे , त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास सांगतो कि मी माझा जोडीदार पसंत करु शकतो. स्वतंत्र विचारसरणीचा, स्व कर्तुत्वावर पुढे येणारा जोडीदार आजकालच्या मुलांचा कल आहे तरीही आजही पालकांना आपल्या मुलांचे लग्न आपणच ठरवावे असे वाटते .

Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!

प्रेम होते पण त्या प्रेमाची परिणीती विवाहात फार कमी जणांची होते. असे असले तरी प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे. प्रेम आणि प्रेमविवाह ह्याचा सर्वांगीण विचार करताना ५, ७, ११, १ ह्या स्थानांचा विचार केला पाहिजे. तसेच चंद्र शुक्र आणि नेपच्यून ह्या ग्रहांचा विचार केला पाहिजे. मंगळ हा विलासी, कामप्रधान ग्रह असल्यामुळे शारीरिक संबंधासाठी त्याचा विचार केला पाहिजे. वृषभ, कर्क, तूळ, मिथुन, वृश्चिक आणि मीन ह्या राशींचा विचार केला पाहिजे. प्रेम भाव फुलण्यासाठी लग्न पंचम नवम लाभ स्थानात शुक्र, चंद्र, नेपच्यून ह्यासारखे ग्रह असणे. चंद्र शुक्र मंगळ नेपच्यून असे ग्रह जर पत्रिकेत वृषभ, कर्क, तूळ, मिथुन वृश्चिक, मीन ह्या राशीत उत्तम फळ देतील. शुक्र मंगळाच्या किंवा मंगळ शुक्राच्या राशीत असेल तर प्रेमात पडण्याचे योग येतात. सप्तमात किंवा पंचमात हर्शल नेपच्यून ह्यासारखे  ग्रह असतील तर जगावेगळे प्रेम होते. अचानक होते आणि अचानक संपते सुद्धा! ५, ७, ११, १ मध्ये जर बुध शुक्र युती असेल तर आणि ही युती प्रेमाच्या राशीत असेल तर एकापेक्षा अधिक प्रेम संबंध असू शकतात.

चंद्र शुक्र , बुध शुक्र ,शुक्र मंगळ ,शुक्र नेपच्यून,हर्शल नेपच्यून अशा युती असतील, तर व्यक्तीचे प्रेमसंबंध होतात. पंचमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध आला तर अनेक प्रेम प्रकरणे घडू शकतात. श्रवण नक्षत्र हे शापित आहे त्यात असणाऱ्या ग्रहांना सुद्धा अशुभत्व येते . १, ७, ५, ९, ११, १ ह्यांच्या स्वामींचा एकमेकांशी संबंध आला . लग्नेश सप्तमात किंवा सप्तमेश लग्नात किंवा सप्तमेश सप्तम स्थानात . पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचम स्थानात . पंचमेश सप्तमेश ,पंचमेश भाग्येश , सप्तमेश भाग्येश ह्यांची युती कुठेही असेल तर, शुक्र नेपच्यून ,शुक्र हर्शल ,शुक्र मंगळ युती असेल तर ज्यावर प्रेम केले त्याच्याशीच लग्न करायची इच्छा असते. लग्नेशाचा पंचमेश ,सप्तमेश किंवा भाग्येशाशी संबंध आला तर आपल्या पसंतीने लग्न होते. ५, ७, ९ ह्या स्थानात चंद्र शुक्र ,नेपच्यून किंवा मंगळ असे ग्रह एकटे किंवा एकमेकांच्या युतीत असतील तर . शुक्र लग्नस्थानी किंवा शुक्र चंद्र नवपंचम योग असेल तर वरील नियमांपैकी जास्तीतजास्त नियम एकाच कुंडलीत असतील तर प्रेमविवाह होतो. सप्तमेश आणि व्ययेश एकत्र आले तर घटस्फोट होऊ शकतो .

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

प्रेम फुलते तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन फुलते. प्रेमाची भावना नसेल तर जीवन निरस होईल . कुणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे ही भावना जीवन जगायला पुरेशी आहे. सहमत? मात्र यातच फसवणून होण्याची शक्यता असेल तर? त्याबद्दल पुढच्या लेखात जाणून घेऊ. 

संपर्क : 8104639230

Web Title: Astrology: There must be yoga in the horoscope for falling in love, falling out of love, and even for a successful love marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.