शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बीड बसस्थानकाचे काम गतीने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST

वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे अनेक ठिकाणी वीजतारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. ...

वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे अनेक ठिकाणी वीजतारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव बंद होण्यास मदत होणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वीज गायब, ग्राहकांत संताप

बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्‌तास वीज गायब असते. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने यावर योग्य ती कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बीड शहरात अवैध प्रवासी वाहतूक

बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खाजगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. हे वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांत बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.