शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचतगटांची आता गावोगावी पोषण बाग मोहीम - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : उमेद अभियानांतर्गत तालुक्यात गावोगावी महिला बचतगटांच्या माध्यमातून उपजीविका पोषण बाग विकसन व महासमृध्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : उमेद अभियानांतर्गत तालुक्यात गावोगावी महिला बचतगटांच्या माध्यमातून उपजीविका पोषण बाग विकसन व महासमृध्दी उपजीविका अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना घर प्रपंचाबरोबर अर्थिक हातभार देखील लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यात उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत गाव पातळीवर माझी पोषणबाग विकसन मोहीम व महासमृद्धी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावी महिला बचत गट यांच्यामार्फत दहा सेंद्रिय पोषण बागा तयार केल्या जात आहेत. त्यामधून मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या ह्या त्यांना घरच्या घरी ताज्या मिळणार आहेत. परिणामी गर्भवती महिला, स्तनदा मातांसह लहान व किशोरवयीन मुले-मुलींना आहारातून विविध पोषणमूल्ये मिळावीत यासाठी राज्य स्तरावरून अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन पोषणबागा प्रत्येक गावात तयार केल्या जात आहेत. महासमृद्धी उपजीविका अभियानांतर्गत बीजप्रक्रिया, बीज उगवण क्षमता प्रात्यक्षिक, पोषणबाग आखणी व लसीकरण व एकत्रित खत बी-बियाणे खरेदी, बीज उगवण क्षमता उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येत आहेत. शनिवारी वारणी येथे उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व कृषी विभागातर्फे बीज प्रक्रिया, उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक घेऊन तूर बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विठ्ठल ढाकणे, विजया दिवटे, अमोल गलांडे, मीरा गिरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

------

विषमुक्त भाजीपाला पिके घ्या

यावेळी तालुका व्यवस्थापक विठ्ठल ढाकणे यांनी सध्याचा काळात बियाणे खूप महाग झाले आहे. त्यामुळे बियाणांवर प्रक्रिया करूनच त्याची लागवड करण्याचे आवाहन केले. तर कृषी सहायक कविता ढाकणे म्हणाल्या, सेंद्रिय पोषण बागेतील ताजा भाजीपाला हा घरातील कुटुंबापुरता वापरून उर्वरित विक्री करून उपजीविका भागवावी. पेरणीला घाई न करता योग्य पाऊस झाला की पेरणी करावी. रासायनिक कीटकनाशके व खते न वापरता सेंद्रिय शेती करून विषमुक्त भाजीपाला व पिके घ्यावीत, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अश्विनी इंगळे यांनी पोषणबाग तयार करण्याचे तंत्र समजावून सांगितले.

===Photopath===

190621\023222221814-img-20210619-wa0014.jpg~190621\023222221814-img-20210619-wa0014.jpg

===Caption===

महिला बचत गटांना पोषन बागेची माहिती देताना कविता ढाकणे~महिला बचत गटांना पोषन बागेची माहिती देताना कविता ढाकणे