शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी अकरा गावांत महिला शेतकरी करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

गंगाभीषण थावरे : मंगळवारी विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा माजलगाव : नेहमी अडचणीत असलेला जिल्ह्यातील शेतकरी दोन ...

गंगाभीषण थावरे

: मंगळवारी विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा

माजलगाव : नेहमी अडचणीत असलेला जिल्ह्यातील शेतकरी दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. सरकार दरबारी वारंवार खेटा मारुन ही विमा मिळत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १ जून रोजी जिल्ह्यातील ११ गावांतील प्रत्येक ग्रामपंचायत समोर एक महिला शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती गंगाभीषण थावरे यांनी दिली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला. मात्र विमा कंपनीने केवळ १३ कोटी विमा वाटप केला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये सोयाबीन, तूर, कापसाचे मोठे नुकसान झाले. शासनाने या सर्व १०७ गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. शासन नुकसान भरपाई देऊ शकते मग विमा कंपनी विमा द्यायला का टाळाटाळ करत आहे असा सवाल थावरे यांनी केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती वारंवार आंदोलन करत आहे. याचाच एक भाग म्हणून १ जून रोजी माजलगाव तालुक्यातील आनंदगाव, खरात आडगाव, बीड तालुक्यातील मौज, शिरुर तालुक्यातील तिंतरवणी, पाटोदा तालुक्यातील भायाळा, केज तालुक्यातील वरपगाव, अंबाजोगाई तालुक्यातील पुस, परळी तालुक्यातील पोहनेर, वडवणी तालुक्यातील कोटरबन, धारुर तालुक्यातील कान्नापूर, केज तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक महिला शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करणार आहे. याच दिवशी भाई थावरे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. विमा कंपनीने विमा न दिल्यास कायदेशीर कारवाई करुन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा थावरे यांनी दिला आहे.

पाठिंबा द्यावा

कोरोनामुळे मोठे आंदोलन न करताना अकरा गावांतील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केले आहे.