शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी क्षणाचे व्हावे लागले साक्षीदार

By admin | Updated: June 5, 2014 00:11 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड ज्या मैदानावर गोपीनाथ मुंडे हेलिकॉप्टर मधून रूबाबात उतरायचे अन् सभा गाजवायचे त्याच मैदानावर त्यांचे पार्थिव कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी ठेवले होते.

व्यंकटेश वैष्णव, बीड ज्या मैदानावर गोपीनाथ मुंडे हेलिकॉप्टर मधून रूबाबात उतरायचे अन् सभा गाजवायचे त्याच मैदानावर त्यांचे पार्थिव कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी ठेवले होते. अंत्यविधीसाठी जमलेले हेच कार्यकर्ते गोपीनाथ मुंडेच्या भाषणावर टाळ्या वाजवायचे. त्याच कार्यकर्त्यांवर अन् त्याच मैदानावर गोपीनाथ मुंडे यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. या दुर्दैवी क्षणाचे साक्षीदार होण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. या विचाराने प्रत्येक कार्यकर्ता ढसढसा रडत होता. वक्तृत्व, कर्तृत्व अन् नेतृत्व या गुणांचा संगम असलेल्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना धरणीमाय जागा देत नव्हती. अशी स्थिती निर्माण झाली होती. अखंड संघर्षाचे प्रतीक असलेले गोपीनाथ मुंडे हे हेलिकॉप्टरने परळीला आल्यानंतर कारखाना मैदानावर सभा घ्यायचे. आजवर शेकडो सभा त्यांनी कारखाना परिसरातील मैदानावर घेतलेल्या आहेत. या सर्व सभांचे साक्षीदार कार्यकर्ते आहेत. मात्र बुधवारी साहेबांच्या अंत्यदर्शनाची वेळ आली. असे कसेच झाले., साहेब आम्हाला अर्ध्यावरती सोडून कसे काय जाऊ शकतात. आता आम्ही पोरके झालो., साहेब तुम्ही परत या. असे शब्द कार्यकर्त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. मंगळवारी याच मैदानावर मुंडे साहेबांची सभा होणार होती. कार्यकर्त्यांकडून नागरी सत्काराचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र सभे ऐवजी त्यांना शेवटचा निरोप द्यावा लागतोय यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. अशा दुर्दैवी घटनेचे साक्षीदार व्हावे लागत असल्याने सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हळहळ व्यक्त करत होता. काय होतय हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. कार्यकर्ते एक दुसर्‍याच्या खांद्यावर डोक ठेवून रडत होते. अश्रू आवरा असे कोणी कोणाला म्हणायचे हेच कळत नव्हते. कारण दुखा:चा डोंगरच कार्यकर्त्यांवर कोसळला होता. आता साहेब आपल्याला कधीच भेटणार नाहीत. याविचाराने जनसागर शोकसागरात बुडाला होता.