शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट नाली करून प्लाॅटमध्ये सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

छत्रपतीनगरमधील नागरिकांना आरोग्याचा धोका माजलगाव : शहरातील प्रभाग एकमधील छत्रपतीनगर या भागात नगरपालिकेने नाली बांधकाम करून दुसऱ्या नालीला जोडणे ...

छत्रपतीनगरमधील नागरिकांना आरोग्याचा धोका

माजलगाव : शहरातील प्रभाग एकमधील छत्रपतीनगर या भागात नगरपालिकेने नाली बांधकाम करून दुसऱ्या नालीला जोडणे आवश्यक होते. अर्धवट नाली करून सर्व पाणी या भागातील एका प्लॉटमध्ये सोडून देण्यात आल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजलगाव शहरालगत असलेल्या बायपास रोडवर छत्रपतीनगर ही कॉलनी नवीन झाली होती. या भागात सुविधा नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून, या भागात रस्ते व नाल्या करून न दिल्यास, या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. यानंतर नगरपालिकेने या भागातील नाल्या बांधकाम सुरू केले.

इतर भागातील पाणी बाहेर काढून देणे आवश्यक असताना अर्धवट नाली करण्यात आली आहे. ही अर्धवट नाली केल्यामुळे येणारे पाणी एका प्लॉटमध्ये सोडण्यात आले आहे.

प्लॉटमध्ये इतर ठिकाणचे पाणी येऊन जमा होत असल्याने आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. त्याचबरोबर या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

याबाबत या भागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून याबाबत सांगितले.

महिन्यापूर्वी मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली होती. परंतु त्यानंतर त्यांनी पुढे काहीच केले नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात या भागातील नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या भागातील नागरिकांना त्रास व्हावा, या उद्देशाने ही नाली जोडू नये, असे गुत्तेदाराला एका नगरसेवकाने सांगितल्याने ही नाली जोडण्यात आली नसल्याचे या भागातील नागरिक सांगत होते. या भागातील एकाने घराचे बांधकाम जास्त करून नाली देखील उंच बांधलेली असल्याने या ठिकाणावरून पाणी जात नाही. संबंधित बांधकामधारकास नोटीस देऊन त्यांची नाली पाडण्यात येईल. त्यानंतर ही नाली पुढे जोडण्यात येईल.

- शेख मंजूर, नगराध्यक्ष

050721\1359purusttam karva_img-20210705-wa0056_14.jpg