शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डबॉय आक्रमक; एसीएसला घातला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

बीड : कोरोना महामारीत काम करूनही मागील दीड महिन्यापासून वेतन नाही. त्यातच आता अचानक कामावरून कमी केले जात असल्याने ...

बीड : कोरोना महामारीत काम करूनही मागील दीड महिन्यापासून वेतन नाही. त्यातच आता अचानक कामावरून कमी केले जात असल्याने वॉर्डबॉय आक्रमक झाले होते. त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना घेराव घालत संताप केला. तसेच काहींनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही तक्रारी केल्या आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर भरती केलेले कर्मचारी कमी केले जात आहेत. यात वॉर्डबॉयचाही समावेश आहे; परंतु एवढ्या महामारीत काम करूनही आरोग्य विभागाने वेळेवर वेतन दिले नाही. अचानक नोकरीवरून काढून टाकल्याने हे सर्व तरुण उघड्यावर पडले आहेत. अगोदर सर्व वेतन द्यावे आणि मगच कामावरून कमी करावे. कमी करताना नियमानुसारच करावे, कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी या वॉर्डबॉयने केली होती. याच मुद्द्यांना धरून सर्व वॉर्डबॉय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे गेले. तेथून आक्रमक होत डॉ. सुखदेव राठोड यांच्या कक्षात जाऊन त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाबद्दलच आपला संताप व्यक्त केला.

---

वेतन का थकले याबाबत माहिती घेतो. आठवड्यात या सर्व वॉर्डबॉयचे वेतन दिले जाईल.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

--

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे रुग्णसंख्या कमी झाल्याने कर्मचारी कमी केले जात आहेत. वॉर्डबॉयचे गैरसमज झाल्याने ते आक्रमक झाले होते.

- डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

---

वॉर्डबॉय भरतीत घोटाळा झालेला आहे. पैसे घेऊन भरती करण्यात आलेली आहे. आता वेतन न देताच त्यांना अचानक कामावरून कमी केले जात आहे. यातही दुजाभाव करून काही मुलांवर अन्याय केला जात आहे. याबाबत आपण जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली आहे.

- दीपक थोरात, सामाजिक कार्यकर्ते, बीड.

===Photopath===

160621\16_2_bed_3_16062021_14.jpeg

===Caption===

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या कक्षाबाहेर वॉर्डबॉयने अशाप्रकारे गर्दी केली होती.