शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:15 IST

खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

धारूर (बीड) : खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोरदार धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने अपघातात गंभीर जखमी वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड ( रा. लाडनांद्रा, ता. सेलू) असे मृताचे नाव आहे. 

सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी यंदाही बुधवार रोजी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. दिंडी शुक्रवारी ( दि.५ ) सायंकाळी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती. रात्री दिंडीतील एक वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिली. या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, धडकेनंतर चालकाने वाहन न थांबवता तसेच पुढे नेले. वाहनाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड