शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला महाग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

इंधन दरवाढीमुळे महागाई अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला ...

इंधन दरवाढीमुळे महागाई

अनलॉकमुळे भाजी विक्रेते शहरात येत असले तरी गावापासून ते शहरात भाज्यांची वाहतूक दर वाढले आहेत. याला कारण इंधन दरवाढ आहे. यामुळेही शहरात भाज्यांचे दर वाढले आहेत.

-सखाराम शिंदे, भाजी विक्रेते.

...

आवक कमी झाली

गेल्या आठवड्यात सलग पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील भाजीपाला तोडता आला नाही. ज्यास्त पाऊस झाल्याने शेतात चिखलातून भाजी काढणे अवघड होते. परिणामी आवक मंदावली व भाव वाढले.

-शेख मोमीन, भाजी विक्रेते.

सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. भाजीपाला लागवड करणे, तो जोपासणे ही कामे करताना रासायनिक खते, कीटकनाशके व मजुरीचे दर, इंधन दरवाढ यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या प्रमाणात भाजीपाल्याला भाव मिळत नाही.

- माउली ढगे, शेतकरी,

....

सगळीकडे भाववाढ चालते. मात्र, शेतकऱ्यांचा भाजीपाला १०, २० रुपयांनी महाग झाला की ओरड होते. लाख रुपये पगार घेणाऱ्या व्यक्तीलाही भाजी १० रुपयांत मिळावी, असेच वाटते. ही धारणा चुकीची आहे. शेतकऱ्यांनाही वाढत्या महागाईत चार पैसे मिळू द्या. त्यांचाही उदरनिर्वाह रस्त्यावर बसून होतो. ही जाणीव ठेवावी.

-सुरेश जगताप, शेतकरी.

...

अगोदरच सर्वत्र महागाई वाढलेली असताना भाजीपाला व फळे महाग झाली आहेत. सामान्य माणसाला हे वाढीव दर परवडणारे नाहीत. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

-अंकिता कुलकर्णी, गृहिणी.

....

कोरोनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे. महागड्या भाज्या खरेदी करण्यापेक्षा आपले वरणच बरे.

-अर्चना धानोरकर, गृहिणी.