सोळंके महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:55+5:302021-07-25T04:27:55+5:30

सोळंके महाविद्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. भानुदास डक, प्राचार्य सानप, नीलकंठ साबळे, प्रा. प्रेम ...

Various programs on the occasion of Solanke College Golden Jubilee Year | सोळंके महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

सोळंके महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

सोळंके महाविद्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. भानुदास डक, प्राचार्य सानप, नीलकंठ साबळे, प्रा. प्रेम राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. प्रकाश सोळंके म्हणाले की, माजलगाव येथे १९७१ साली सुंदरराव सोळंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून महाविद्यालयाची सुरुवात केली. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना महाविद्यालयामुळे चालना मिळाली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागून आज महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख वाढला आहे. प्रशस्त इमारती व प्रांगण, लायब्ररी, मैदान, ट्रॅक, मुलींसाठी वसतिगृह यासह विविध सुविधा असल्याने येथे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०२१-२२ हे वर्ष सुवर्णमहोत्सवी असल्याने महाविद्यालयाकडून वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. ऑगस्ट महिन्यात कोविड लसीकरण कॅम्प, व्यापाऱ्यांसाठी व्याख्यान, रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षेसाठी व्याख्यान,सप्टेंबर १५,१६,१७ दरम्यान व्याख्यानमाला, शेअर बाजार मार्गदर्शन,१५ ऑक्टोबर विज्ञान प्रदर्शन, वादविवाद-स्पर्धा, नोव्हेंबर आरोग्य शिबिर, महिला आरोग्य तपासणी, डिसेंबर महिन्यात कृषी प्रदर्शन,६ जानेवारी दर्पण दिन,खेळ स्पर्धा, माजी विद्यार्थी, कर्मचारी,पालक मेळावा, फेब्रुवारी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा शिवजयंती व्याख्यान, गुणवंत सत्कार, ८ मार्च जागतिक महिला दिन,१४ एप्रिल ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान, चर्चासत्र, विशेषांक प्रसिद्धी. याप्रमाणे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात माजी विद्यार्थी यांनी आपले मत व सहभाग नोंदवावा, असे आवाहन ही आ. सोळंके यांनी केले.

Web Title: Various programs on the occasion of Solanke College Golden Jubilee Year