शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथांच्या परळीत ‘तिसरा डोळा’ बंद पडू लागला - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

परळी : जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौक, ...

परळी : जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौक, रस्ते, तसेच सार्वजनिक ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले हाते; परंतु मागील काही दिवसांपासून सीसीटीव्हीचे २३ कॅमेरे पूर्णपणे बंद असून ही यंत्रणा कोलमडली आहे. परळी वैद्यनाथ शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेकडे रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. शहरात कॅमेरे प्रमुख चौक, सर्व रस्ते तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. दोन वर्ष कॅमेरे चालू राहिले; परंतु नंतर मात्र या यंत्रणेच्या उपयोगितेकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे बियाणी यांनी निवेदनात म्हटले आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त असताना, तसेच ही यंत्रणा पोलिसांसाठी मदतीचा हात ठरत असताना या तिसऱ्या डोळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहर व ग्रामीण पोलिसांसाठी गस्त पथक वापराकरिता असलेली वाहने अत्यंत खराब असून परळी शहर व संभाजीनगर ठाण्याला नव्या अत्याधुनिक पेट्रोलिंग वाहनाची उपलब्धता करून द्यावी, असेही बियाणी यांनी या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना देण्यात आल्या आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत करावी व पोलिसांना पेट्रोलिंगसाठी आधुनिक वाहने द्यावीत. - चंदूलाल बियाणी, राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य बीड.

परळी शहरातील २३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. वायर निघणे, वीजपुरवठा न होणे आदी कारणांमुळे कॅमेरे बंद आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले, तर परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे एक महिन्यापासून रजेवर आहेत.