शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा शेतकरी पायतानाने झोडपून काढतील : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 16:28 IST

Raju Shetty : महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ?

केज ( बीड ) : महावितरणने पूर्वसूचना न देता सक्तीची वीज बील वसुली सुरु केल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. हा अन्याय तात्काळ थांबवून महावितरणने पूर्ववत वीज जोडून द्यावी, अन्यथा शेतकरी पायतांन घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी दिला. ते तालुक्यातील नाव्होली येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करत होते. 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान, नाव्होली यांच्या संयुक्त विद्यमाने "शेतकरी संताप मेळाव्याचे" आयोजन शुक्रवारी  सायंकाळी 7 वाजता  करण्यात आले होते. माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापले, सक्तीची वीज बील वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ? गेल्या महिनाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने झालेल्या मराठवाडा -विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या परिषदेमुळे व  रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट उठविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे संघटित होऊन थोडा संयम बाळगावा सोयाबीनचे दर आणखीन वाढतील आश्‍यकतेनुसार सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन ही शेट्टी यांनी केले. यावेळी मंचावर जेष्ठ नेत्या प्रा.सुशीलाताई मोराळे, जिल्हाध्यक्ष(पक्ष) कुलदीप करपे, गजानन बंगाळे, पूजा मोरे, रवींद्र इंगळे,(संघटना) जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर, अशोक गीते, प्रमोद पांचाळ, अशोक साखरे, सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शहा, सी.बी.एस. इनामदार, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस आदींची उपस्थिती होती.  

सोमवारी महावितरण कार्यालयावर 'हल्लाबोल मोर्चा' महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध व सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात अंबाजोगाईत महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर सोमवारी ( दि.29 ) सकाळी 11  वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "हल्लाबोल"मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून ताकतीने यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी बळीराजा प्रतिष्ठान चे सी.बी.एस.इनामदार, रणजित बिक्कड, अंकुश बिक्कड, कल्याण केदार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे केज शहराध्यक्ष फेरोजभाई पठाण, भागवत पवार, सुग्रीव करपे, नवनाथ काकडे, चंद्रकांत अंबाड,भारत मुळे, बिभीषण इंगळे,विश्वास जाधव आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBeedबीडmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी