शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय भाजीपाला गाजवू लागला तोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

शिरूर कासार : कोरोनाने चलनवलनासह खानपानही शिकविले. त्यात रासायनिक खत व कीटकनाशकांसह अन्य घातकी पदार्थांचा वापर करून झटपट देखणा, ...

शिरूर कासार : कोरोनाने चलनवलनासह खानपानही शिकविले. त्यात रासायनिक खत व कीटकनाशकांसह अन्य घातकी पदार्थांचा वापर करून झटपट देखणा, फसवा, घातकी भाजीपाला आरोग्याला बाधक ठरतो, हे आता लक्षात आल्याने, गावरान तथा सेंद्रिय भाजीपाला आपला तोरा गाजवू लागला. वारणीचा महिला बचत गट या कामी सक्रिय होता, परंतु विक्रीसाठी जागा उपलब्ध नव्हती. जागतिक कृषी दिनी तहसीलदार यांनी नगरपंचायतीचा बाजारओटा मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्याची पूर्ती शनिवारी करण्यात आली. तहसीलदार श्रीराम बेंडे यांचे हस्ते सेंद्रिय भाज्या विक्री स्टाॅलचे उद्घाटन करण्यात आले.

तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी उमेदचे तालुका अभियान समन्वयक विठ्ठल ढाकणे, तालुका समन्वयक कुंदन मोरे, अमोल गलांडे, विजय दिवटे, कृषी सहायक कविता ढाकणे, संजय फरताडे आदी उपस्थित होते.

भूमाता सेंद्रिय शेती उत्पादक गटाच्या महिलांचा धाडसी उपक्रम

सध्या सर्वत्र देखणा आणि चमकदार मालाची भुरळ सर्वांनाच पडली आहे, अशा परिस्थितीत गावरान तथा सेंद्रिय खतावरचा भाजीपाला पिकविण्याचे धाडस बचत गटाने केले. याचे फायदे लक्षात आणून देत, ग्राहकाच्या गळी हा आरोग्यमयी भाजीपाला उतरविण्याचे धाडसी काम करत आहेत, यात महिला बचत गटाच्या मिरा गिरी, प्रतिभा जगताप, जयश्री घुले, रत्नमाल केदार, तारामती केदार आदी महिला पिकविणे आणि विक्री करणे या कामात यशस्वी होत आहे.

स्वस्तात गुणकारी औषधी स्टाॅलवर

भाजीपाल्याबरोबरच स्टाॅलवर दशपर्णी अर्क, निम अर्क, वेस्टडी काॅम्पोस्ट, जीवामृत यांसारखे तयार केलेले सेंद्रिय औषधी स्वस्तात व गुणकारी असलेल्या भाज्या ठेऊन महिला प्रबोधनही करत आहेत.

240721\img-20210724-wa0023.jpg

शेंद्रिय शेती भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र स्टाॅल शुभारंभ प्रसंगी तहसिलदार श्रीराम बेंडे सह विठ्ठल ढाकणे ,कुंदन मोरे ,कविता ढाकणे बचत गटाच्या मिरा गिरी आदी