शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसोबत काम करणाऱ्या होमगार्डवर उपासमारीची वेळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे ...

माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे महापुरुषांची जयंती, सण-उत्सव किंवा संवेदनशील वातावरणात बंदोबस्तासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाते. हे जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी असतात. नाइलाज तसेच आज किंवा उद्या मानधन मिळेल, या आशेवर ते काम करत आहेत.

मागील १५-१६ महिन्यांपासून कोरोना काळात हे होमगार्ड भीतीयुक्त वातावरणात रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु या विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत त्यांचे मानधन वेळेत दिले जात नाही. जानेवारीपासून मानधनच मिळालेले नसल्याचे गृहरक्षक दलाच्या जवानांनी सांगितले. सध्या महागाई वाढलेली असताना आणि वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात मिळून ६० होमगार्ड कार्यरत आहेत तर बीड जिल्ह्यात ७५० पेक्षा जास्त होमगार्ड कार्यरत आहेत. या सर्वांचे मानधन रखडले आहे.