शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

‘पोषण’ महिन्यात लागणार यंत्रणेचा कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:28 AM

: कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस लागणार आहे. समुदाय आधारित उपक्रमांवर भर देत जिल्ह्यात सर्वत्र पोषण उत्सव सुरु असून या कार्यक्रमाच्या दैनंदिन नोंदी पोषण अभियानाच्या डॅश बोर्डवर आॅनलाईन होत आहेत.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग चंद्रशेखर केकान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शन व नियोजनातून जिल्हाभर पोषण उत्सव सुरु आहे. सर्व अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळांबरोबरच पालकांचा सहभाग वाढत आहे.पोषण अभियानात सर्व अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत मोबाईलच्या माध्यमातून कॅस अ‍ॅप्लिकेशन अंतर्गत सर्व रेकॉर्ड ,दैनंदिन नोंदी, वजन, उंची, आहार वाटप नोंदी आॅनलाईन होत आहेत. यातून आता वेळेवर पर्यवेक्षण होत आहे. सर्व अंगणवाडी केंद्रात सुपोषण दिवस, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, गरोदर माता नोंदणी, ग्राम आरोग्य व पोषण दिवस असे नियमित कार्यक्र म होत आहेत.पोषण महिन्यात सर्व अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने एकत्रितरित्या बालकांचे एक हजार दिवस , रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीवर घराघरात पोषण उत्सव साजरा होत आहे. यात किशोरवयीन मुली, बालके, गरोदर व स्तनदा माता ,सर्व स्त्रिया हे प्रामुख्याने लक्ष्य घटक आहेत.सर्व एकात्मिक बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, कार्यकर्ती, जिल्हा व तालुका गट समन्वयक, मदतनीसांची टीम हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे.पोषण उत्सवासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप, महादेव जायभाये, व्यंकट हुंडेकर, रामेश्वर मुंडे, सखाराम बांगर, थोरात, शोभा लटपटे, तांदळे, दहिवाळ, कदम, बुधुक, विस्तार अधिकारी अजय निंबाळकर, वैभव जाधव, जहागीरदार, किशोर आघाव, संतोष जगताप, पन्हाळे, जिल्हा पोषण अभियान समन्वयक भूषण विडले, चाळक, तिडके आदी परिश्रम घेत आहेत.२०२२ पर्यन्त कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे ,स्त्रिया व किशोरी यांचा अ‍ॅनिमिया कमी करणे ,जन्मत: कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी करणे या सर्वांवर एकित्रत लक्ष्यप्राप्तीसाठी ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ,माहिती व प्रसारण विभाग, समाजकल्याण विभाग ,अन्न व पुरवठा विभागाच्या एकत्रित अभिसरणातून ही मोहीम राबविली जात आहे. बालके ,किशोरी ,गरोदर व स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी जनआंदोलन उभारुन समाजात पोषण व आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfoodअन्नSchoolशाळाStudentविद्यार्थी