कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फरार तीन आराेपी जेरबंद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:47+5:302021-07-26T04:30:47+5:30

परळी : कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान परळी ग्रामीण पोलिसांनी फरार असलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मागील वर्षांपासून फरार म्हणून ...

Three RAPs arrested in combing operation - A | कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फरार तीन आराेपी जेरबंद - A

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फरार तीन आराेपी जेरबंद - A

परळी : कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान परळी ग्रामीण पोलिसांनी फरार असलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मागील वर्षांपासून फरार म्हणून घोषित असलेल्या दोघांना तालुक्यातील संगम येथे, तर दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला धारावती तांडा येथे ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एक वर्षापूर्वी घातक शस्त्र वापरून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तालुक्यातील संगम येथील आत्माराम दराडे (वय ३९) व रत्नेश्वर दराडे (२२) हे एक वर्षापासून फरार होते. दोन्ही आरोपी परळी ग्रामीण पोलिसांना हवे होते. परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्रीनंतर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यादरम्यान आत्माराम दराडे, रत्नेश्वर दराडे या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई सपोनि विशाल शहाणे, पोलीस कर्मचारी पांडुरंग श्रीमंगले, पंडित पांचाळ, वनिता गजभार, नेहा करवंदे यांच्या पथकाने केली. तसेच परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील परमेश्वर ऊर्फ प्रवीण बाबू पवार हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना दारू विक्रीच्या गुन्ह्यात हवा होता. शुक्रवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना तो ऑटो रिक्षामध्ये झोपलेला आढळून आला. त्यास तत्काळ पकडण्यात आले.

Web Title: Three RAPs arrested in combing operation - A