शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बोअरला पाणी वाढल्याने नळाचे पाणी रस्त्यावर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

आष्टी : शहरातील उपनगर म्हणून ओळख असलेल्या मुर्शदपूर ग्रामपंचायतमधील अनिल भय्यानगरमध्ये पाणीपुरवठा केलेल्या नळाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात ...

आष्टी : शहरातील उपनगर म्हणून ओळख असलेल्या मुर्शदपूर ग्रामपंचायतमधील अनिल भय्यानगरमध्ये पाणीपुरवठा केलेल्या नळाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी सायंकाळी ग्रामपंचायतने पाणीपुरवठा केला होता. मात्र या भागातील बऱ्याच रहिवाशांच्या बोअरला चांगले पाणी असल्याने नळाद्वारे आलेले पाणी अनेकांनी भरले नाही. परिणामी ते पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. नळांना तोट्या नसल्याने हे पाणी वाया जात आहे. याकडे मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

कासारी मुर्शदपूर शिदेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असून या भागात तालुक्यातील अनेक गावचे नागरिक व नोकरदार अनेक वर्षांपासून रहिवासी झालेले आहेत. ते स्थायिक झाल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नागरिकांना पाणी टंचाई जाणवली नाही. जूनमध्ये पावसाने हजेरी लावली. काही गावांत बऱ्यापैकी पाऊस झाला. मुर्शदपूरमधील अनिल भय्यानगरमध्ये बहुतांश रहिवाशांच्या बोअरला पाणी आहे. त्यामुळे नळाद्वारे सोडण्यात आलेल पाणी त्यांनी भरले नाही. रस्त्यावर नळ घेतल्याने नळाला आलेले पाणी न भरल्याने तसेच तोटी नसल्याने पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात तळे साचले होते. ज्या नागरिकांनी नळ रस्त्यावर घेतलेले आहेत त्या नागरिकांना ग्रामपंचायतीने समज देऊन पाण्याची होणारी नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अनिल भय्यानगरमधील रहिवाशांनी केली आहे.

040721\5226img-20210704-wa0440_14.jpg