शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सुर्डी अत्याचार प्रकरणात कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

बीड : माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष होत असेल तर ...

बीड : माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठांनी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करावी. योग्यरितीने तपास न झाल्यास आम्ही त्या विरोधात आंदोलन उभारू, असे प्रतिपादन एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केले.

बीड येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कादरी बोलत होते. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफीक यांची उपस्थिती होती. डॉ. कादरी म्हणाले, माजलगाव तालुक्यात घडलेली घटना निंदनीय आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक केली. परंतु, त्यानंतर त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी पोक्सो हा कायदा आहे. या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना आरोपीला थेट न्यायालयीन कोठडी कशी काय मिळू शकते? असा आमचा प्रश्‍न आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी. या प्रकरणाचा सखोल तपास करून ती बाजू न्यायालयासमोर मांडावी. आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने योग्य दिशेने तपास होणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांची भेट घेतली असून, त्यांनी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले. आम्ही या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. कादरी म्हणाले.

दरम्यान, यवतमाळ येथे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉ. कादरी यांनी केला. या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित केले असले तरी यातील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचे डॉ. कादरी म्हणाले. यावेळी एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.