शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री कारमधून अवैध डिझेल अन् देशी दारूची तस्करी रोखली! केज पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:03 IST

जीवाचीवाडी-तुकुचीवाडी रस्त्यावर पोलिसांची धडक कारवाई.

केज (जि. बीड): तालुक्यातील जीवाचीवाडी ते तुकुचीवाडी या रस्त्यावरून सोमवारी मध्यरात्री अवैध डिझेल आणि विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर पोलिसांनी छापा टाकला. केज पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या धाडीत ४ लाख २२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहन चालक अनंत चौरे (रा. जीवाचीवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निवडणूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यरात्रीची गुपिते उघड; कारमध्ये काय आढळले?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एम एच १२ / के वाय २१४८ या क्रमांकाच्या कारमधून साहित्याची तस्करी होत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कारची झडती घेतली असता, त्यात ११ हजार ५०० रुपये किमतीचे १२५ लिटर अवैध डिझेल आणि १० हजार ९५० रुपये किमतीचे 'बॉबी' ब्रँडच्या देशी दारूचे ३०० बाटल्यांचे ३ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कारसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस पथकाची धडाकेबाज कामगिरी
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, अमिरोद्दीन इनामदार, जावेद कराडकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. जमादार बालासाहेब डापकर यांच्या फिर्यादीवरून अनंत चौरे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अवैध डिझेल साठा आणि विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा इशारा: अवैध धंदे खपवून घेणार नाही
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तालुक्यात अशा प्रकारे छुप्या मार्गाने होणारी इंधन आणि दारूची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे गस्त पथक आता अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Diesel and Liquor Smuggling Busted in Kej; One Arrested

Web Summary : Kej police seized illegal diesel and liquor worth ₹4.22 lakhs from a car near Jiwachiwadi, arresting driver Anant Choure. The raid, prompted by a tip, uncovered 125 liters of diesel and 300 bottles of liquor. Police intensify crackdowns before elections.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी