शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांच्या वेळा वाढवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात ...

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ओसंडून वाहत असल्याने येथे अनेकजण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. अशी मागणी होत आहे.

पाणी साठविण्याची गरज

अंबाजोगाई : दरवर्षी अंबाजोगाई शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मोठा पाऊस होऊनही आठवड्यातून एकदा पाणी मिळते. मात्र, तरीसुद्धा रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे नगर परिषदेच्यावतीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची अडचण

अंबाजोगाई : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते. अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काहीजण आठवीपासूनच तर काहीजण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे

अंबाजोगाई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. परंतु, ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहिती घेत नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.