शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार, बीड जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:06 IST

आरोग्य मंत्र्यांच्या फोननंतरही कारवाई होणार का? विडा आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप.

- सोमनाथ खताळबीड :बीड जिल्ह्याचा कणा असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी असलेली परवड काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. कष्टाचे डोंगर उपसून ऊसतोडीचा हंगाम संपवून परतलेल्या महिला मजुरांना आता सरकारी दवाखान्यातही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

बेड १० आणि रुग्ण १५; नियोजन शून्य !२२ एप्रिल रोजी विडा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, आरोग्य केंद्रात केवळ १० बेड उपलब्ध होते. उर्वरित पाच महिलांना शस्त्रक्रियेसारखी गंभीर प्रक्रिया पार पडल्यानंतर चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. संसर्गाचा मोठा धोका असतानाही, या महिलांना अशा असुरक्षित स्थितीत ठेवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.

प्रशासनाकडून अजब 'सारवासारव'या प्रकरणाची माहिती पसरल्यानंतर प्रशासनाने अजब तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. "त्या महिलांनीच आम्हाला जमिनीवर उपचार चालतील, असे सांगितले होते," असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन गायकवाड यांनी केला आहे. मात्र, रुग्ण असुविधा असतानाही उपचार करा म्हणत असेल, तर डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रुग्णाला धोकादायक स्थितीत ठेवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे.

आरोग्य मंत्र्यांकडूनही विचारणाया प्रकाराची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दखल घेतली. त्यांनी थेट महिला रुग्णांशी संवाद साधला. मात्र, त्याआधीच या महिलांना प्रशासनाकडून "काय बोलावे" याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार झाली नसल्याची चर्चा आहे. आता आबिटकर कारवाई करणार की, डॉक्टरांच्या खुलाशावर समाधान मानून त्यांना पाठीशी घालणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महिलांनीच आग्रह धरला१५ पैकी ५ महिलांना गादी टाकून उपचार केले. संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली. महिलांनीच कामाला जायचे असल्याने आग्रह धरला होता. आरोग्य मंत्री यांनीही फोनवरून महिला रुग्णांशी संवाद साधला आहे.-डॉ. रोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, विडा ता. केज.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Sugarcane Workers Treated on Ground After Sterilization, Outrage Ensues

Web Summary : In Beed, sugarcane worker women were allegedly treated on the floor post-sterilization at a primary health center due to bed shortage. Officials claim women insisted, but the health minister is investigating the incident amid concerns of negligence.
टॅग्स :BeedबीडHealthआरोग्य