किल्ले धारूरच्या हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:24+5:302021-06-21T04:22:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : किल्ले धारूर युथ क्लबच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मारक येथे तणनाशक फवारणी करून स्वच्छता अभियान ...

Sanitation campaign at the Martyrs' Memorial at Fort Dharur | किल्ले धारूरच्या हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान

किल्ले धारूरच्या हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : किल्ले धारूर युथ क्लबच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मारक येथे तणनाशक फवारणी करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

हुतात्मा काशीनाथ स्मारक हे वयोवृद्ध व बालकांना निसर्गरम्य आनंद देणारे धारूर शहरातील एकमेव ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून स्वच्छता केली नव्हती. परिसरात गाजरगवत, तण उगवल्याने वृद्धांना पाय ठेवायलाही जागा नव्हती. रविवारी किल्ले धारूर युथ क्लबच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून येथील गाजरगवत व तणांवर तणनाशक फवारणी केली. परिसरात स्वच्छता केली. अभियानासाठी युथ क्लबचे अध्यक्ष गौतमराव शेंडगे, रवी गायसमुद्रे, माजी अध्यक्ष सुरेश शिनगारे, सूर्यकांत जगताप, अनिल तिवारी, अशोक लोकरे, दत्तात्रय गोरे, प्रदीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

200621\img-20210620-wa0037.jpg

===Caption===

किल्लेधारूर युथ क्लब चे वतीने तान नाशक फवारणी करताना

Web Title: Sanitation campaign at the Martyrs' Memorial at Fort Dharur