शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांनी सांगितलेय.., अवैध धंदेवाल्यांना जाऊ द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : लॉकडाऊन काळात येथील परभणी टी पाॅईंटवर ग्रामीण पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी सुरू आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव

: लॉकडाऊन काळात येथील परभणी टी पाॅईंटवर ग्रामीण पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी सुरू आहे. या तपासणीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे, तर अवैध धंदेवाल्यांना ‘जाऊ द्या..., साहेबांनी सांगितले आहे...’, असे म्हणून सूट देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लॉकडाऊन असल्याने शहरात शहर पोलीस ठाण्यासमोर वाहन तपासणी, तर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून परभणी फाटा व सावरगाव येथे वाहन तपासणी करण्यात येते. येथे असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहनधारकांना खरेच काम आहे का? वाहनांवर दंड आहे का? त्यांच्याकडे परवाना आहे का? अशी विचारणा केली जात आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच सर्व जनता मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व बाजूंनी त्रस्त झालेली आहे. केव्हा काय होईल, याचा नेम नाही म्हणून प्रत्येक जण जीव मुठीत धरून जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक लोक कुटुंबातील व्यक्तिंना घेऊन दवाखान्यात येतात. कोणाच्या घरी दुःखद घटना घडलेली असते, तर कोणी शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते याकरिता गावातून वाहने घेऊन येतात. या सर्वांची तपासणी करून त्या नावावर बराच वेळ अडवणूक होत आहे. महिला, लहान मुले, असे कुटुंब असतांना बराच वेळ थांबवून ठेवण्यात येते, तर दुसरीकडे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्ती थांबवल्या तर चौकात बसलेल्या साहेबांना फोन जातो लगेच... अरे जाऊ द्या..., साहेबांनी सांगितले आहे. असे म्हणून त्या व्यक्तीचे वाहन सोडण्यात येत असल्याचे रविवारी निदर्शनास आले. याच पद्धतीने वाळू वाहने व इतर हितसंबंध असणाऱ्यांची वाहने सर्रासपणे सोडली जातात. मात्र, खते आणि बी - बियाणे खरेदी करण्यासाठी येणारी शेतकऱ्यांची वाहने अडवली जात आहेत. परवाना व कागदपत्रे, अगोदरचा दंड या नावावर दंडाच्या पावत्या फाडून घळाटवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पैसे जमा करण्यात येत आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय, तर अवैध धंदे करणाऱ्यांना दुसरा न्याय असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. याबाबत वरिष्ठांनी तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

....

सर्वसामान्य जनतेला असा त्रास दिला जात नाही. जनतेला असा त्रास व्हायला नको. असा काही प्रकार होत असेल, तर माहिती घेऊन चौकशी करू.

- सुरेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव.

===Photopath===

300521\purusttam karva_img-20210530-wa0024_14.jpg~300521\purusttam karva_img-20210530-wa0022_14.jpg

===Caption===

लॉकडाऊन काळात येथील माजलगाव येथील परभणी टी पाँईंटवर ग्रामीण पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी सुरू आहे. याचा सर्वसामान्यांनाच संताप होत आहे.~