शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नियम सर्वांना सारखाच; बीडमध्ये चक्क न्यायाधीशांना २०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 14:41 IST

चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यांनी सर्व कागदपत्रांची विचारपूस केल्यावर ती दाखविण्यात आली.

ठळक मुद्देपोलिसाची कर्तव्यातील प्रामाणिकता कार चालविताना सीट बेल्ट न लावल्याने कारवाई

बीड : कार चालविताना सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी चक्क एका न्यायाधीशांना २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हवालदार जालिंदर बनसोडे यांनी केली. नियम सर्वांना सारखाच असल्याचे दाखवित बनसोडे यांनी कर्तव्यातील प्रामाणिकतेचा परिचय दिला आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरत असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. जे लाेक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, तसेच विनाकारण बाहेर फिरल्याची खात्री पटते, अशांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. अशीच नाकाबंदी सोमवारी सकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू होती. पोलीस हवालदार जालिंदर बनसोडे हे येथे कर्तव्यावर होते. बसस्थानकाकडून येणारी चारचाकी वाहने त्यांनी अडविली. चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यांनी सर्व कागदपत्रांची विचारपूस केल्यावर ती दाखविण्यात आली. परंतु, सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी २०० रुपये पावती फाडण्याबाबत त्यांनी सांगताच समोरील व्यक्तीने आपले ओळखपत्र दाखविले. यात ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असल्याचे समजले. परंतु, बनसोडे यांनी नियम सर्वांना सारखाच आहे. असे सांगत २०० रुपये चलन ऑनलाईन टाकले. यावर संबंधित न्यायाधीशांनीही हा दंड रोख स्वरूपात भरला. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

नियम सर्वाना सारखाचनियम सर्वांना सारखाच आहे. स्वत:चे ओळखपत्र दाखविले तरी सीट बेल्ट नसल्याने १३८ (१) १७७ या नियमांतर्गत २०० रुपये दंड आकारण्यात आला.- जालिंदर बनसोडे, पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड

टॅग्स :BeedबीडTrafficवाहतूक कोंडीCourtन्यायालय