शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर निर्मळ-आडसकर रिंगणात, सोळंके-जगतापांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:49 IST

माजलगाव मतदारसंघात ९८ जणांपैकी ६४ जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

माजलगाव: माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ९८ जणांपैकी ६४ उमेदवारांनी सोमवारी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता महायुतीचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके, महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष रमेश आडसकर, अपक्ष माधव निर्मळ या प्रमुख उमेदवारांसह ३४ जण निवडणुक रिंगणात आहेत.

माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत प्रमूख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण ९८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, अॅड. नारायण गोले, गंगाबिषण थावरे, नितीन नाईकनवरे, उद्धव नाईकनवरे आदि प्रमुखांसह ६४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता अजित पवार राष्ट्रवादी, भाजप, शिंदे शिवसेना महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार राष्ट्रवादी, शिवसेना, कॉँग्रेस महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष रमेश आडसकर,अपक्ष माधव निर्मळ या प्रमुख उमेदवारासह ६४ उमेदवारांत  चुरसीची लढत होईल.

दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर रिंगणातअजित पवार राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिल्याने जिल्हा कोषाध्यक्ष माधव निर्मळ नाराजगी व्यक्त करत पक्षापासून वेगळे झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे भाजपमधून शरद पवार राष्ट्रवादीत गेलेले रमेश आडसकर यांना मोहन जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्याने धक्का बसला. त्यामुळे त्यांनी देखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. आता मतदारसंघात महायुतीचे सोळंके, महाविकास आघाडीचे जगताप आणि दोन्ही राष्ट्रवादीचे बंडखोर निर्मळ, आडसकर यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४majalgaon-acमाजलगांवmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक