वडवणी तालुक्यात रानडुकरांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST2021-07-29T04:32:27+5:302021-07-29T04:32:27+5:30

शेतातील पिके जगवत असताना शेतकरी अनेक अडचणीला सामोरे जाताना दिसत आहे. काही ठिकाणी जोरदार पाणी तर काही ठिकाणी अल्प ...

Raising of cows in Wadwani taluka | वडवणी तालुक्यात रानडुकरांचा उच्छाद

वडवणी तालुक्यात रानडुकरांचा उच्छाद

शेतातील पिके जगवत असताना शेतकरी अनेक अडचणीला सामोरे जाताना दिसत आहे. काही ठिकाणी जोरदार पाणी तर काही ठिकाणी

अल्प पाण्यावर पिकाची जोपासना करत पिकाचे संरक्षण करावे लागत आहे. ग्रामीण भागात रानडुकराचा धुमाकूळ रोखण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी फटाके वाजवून रात्रभर व दिवसभर जोपासना करत आहेत. रानडुकरे ही रात्रीच्या वेळी शेतातील पिकाची नासाडी करत आहेत तातडीने ग्रामीण भागातील रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी मामला, साळीबा, चिचोटी, पिपरखेड, लक्ष्मीपूर, कान्हापूर, बाहेगव्हाण, तिगाव, मोरवड येथील शेतकरी करत आहेत.

वनविभागाने ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ लक्षात घेऊन रानडुकरांच्या धुमाकूळीने पिकाची नासाडी झालेल्या ठिकाणी येऊन पंचनामा करावा व मदत करण्याची मागणी चिंचोटी येथील नुकसानग्रस्त शेतकरी सुमंत गोंडे यांनी केली आहे

Web Title: Raising of cows in Wadwani taluka