उमापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:34 IST2021-05-26T04:34:12+5:302021-05-26T04:34:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरामध्ये शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळताना १३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही ...

Raid on gambling den at Umapur | उमापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

उमापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरामध्ये शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळताना १३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने २५ मे रोजी केली.

उमापूर येथे जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. याप्रकरणी त्याठिकाणी छापा मारून सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी मधुकर आहेर, रमेश जाधव, नितीन चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, अरुण केशभट, रवी बनसोडे, संभाजी आहेर, शेषेराव कापसे, अली सय्यद नजीर, अनिल आहेर, अशोक केशभट, सुरेश खेडकर, शामसुंदर पवार अशी जुगार खेळताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख ६८ हजार ६७० व मोबाईल ३ लाख ५८ हजार असा एकूण मुद्देमाल ४ लाख २६ हजार ६७० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling den at Umapur