शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे, कोरोना काळात हाल - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ...

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसून एकाही ठाण्यात त्यांच्या हद्दीतील वृद्धांच्या संख्येची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना काळात या एकट्या राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे असून, त्यांना आधाराची गरज आहे.

जिल्ह्यातील शहरांमध्ये अनेक वृद्ध एकटे राहात आहेत. यामध्ये महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. मुले-सुना नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. काहींचे परदेशात असतात. त्यामुळे या वृद्धांना कोरोना काळात अनेक गोष्टींची गरज असताना देखील त्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले. दरम्यान, अशा वृद्ध दाम्पत्यावर लक्ष ठेवून त्यांना लुटण्याचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वृद्धांकडून व्यक्त केले जात आहे.

औषधी आणण्याची ही सोय नाही

लॉकडाऊनच्या काळात मेडिकल सुरू होते. मात्र, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने वृद्धांची अवस्था बिकट झाली होती. काही वेळा शेजारी व नातेवाईकांनी औषधी आणण्यासाठी मदत केली, तर काही वेळा त्यांनाच पायपीट करावी लागली.

पोलीस ठाण्यात वृद्धांची नोंद नाहीच

पोलीस ठाणे हद्दीतील एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या मदतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, तशा पद्धतीने कोणत्याच शहरातील वृद्धाची नोंद केली असल्याची माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांकडून कायम होते मदत

पोलीस ठाण्यात वृद्ध नागरिक काही कारणास्तव आले तर, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाते. तसेच वृद्धांना कायम मदत करण्याचा हेतू पोलीस प्रशासनाचा असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

मुलगा व सुना बाहेरगावी राहत असल्याने एकटाच राहतो. इतर वेळा सहसा त्रास होत नाही. पण कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणी समोर उभ्या आहेत. पैसे असून देखील जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. पोलीस ठाण्यात याविषयी मदत मागितली नाही. परंतु, शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मदत केल्यामुळे दोन्ही लाटेत आम्ही सुखरूप आहोत. एक वृद्ध, केज

मुले सुनांना घेऊन वेगळे राहतात. ते माझ्याजवळ राहत नाहीत. काही व्याधी नसल्यामुळे अद्याप कसला त्रास नाही. मात्र, माझ्यासारख्या अनेक वृद्धांचे हाल आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. मदत कोणाकडे मागावी, हे देखील त्यांना कळत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. एक वृद्ध, बीड