शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाची हरवलेली पिशवी पोलिसांनी ४ तासात शोधली; त्यातून निघालेली रक्कम पाहून सारेच झाले अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:04 IST

कोरोना पार्श्वभूमीवर परळी चे प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर लॉकडाऊनमुळे काही महिन्यापासून बंद आहे.परंतु, मंदिराच्या पायऱ्यावर काही निराधार बसलेले असतात.

ठळक मुद्देवैद्यनाथ परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबुराव नाईकवाडे हे ८० वर्षीय वृद्ध थांबतात. दानशुरांनी दिलेली रक्कम ते एका पिशवीत ठेवतात. रक्कम ठेवलेली पिशवी ते कधीच आपल्यापासून दूर करत नाहीत.

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथ मंदिर परिसरातील एका ८० वर्षाच्या वृद्धाजवळील एक पिशवी अचानक गायब झाल्याच्या प्रकार मंगळवारी सकाळी घडला. पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून तपास करत रामनगर तांडा परिसरातून चोरीस गेलेली पिशवी शोधून काढली. यावेळी पोलिसांनी पिशवीतील रक्कम मोजली असता त्यात १ लाख ७२ हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्याने सारेच अवाक झाले. 

याबाबतची माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर परळी चे प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर लॉकडाऊनमुळे काही महिन्यापासून बंद आहे..परंतु मंदिराच्या पायऱ्यावर काही निराधार बसलेले असतात. त्यांना जवळच मोफत शीवभोजन दिले जाते. तसेच शहरातील काही दानशूर लोक मंदिर परिसरातील निराधारांना नाष्टा,जेवण, फळ, चहापाणी यासोबत रोख स्वरुपात दान देतात. येथेच गेल्या काही वर्षांपासून बाबुराव नाईकवाडे हे ८० वर्षीय वृद्ध थांबतात. दानशुरांनी दिलेली रक्कम ते एका पिशवीत ठेवतात. रक्कम ठेवलेली पिशवी ते कधीच आपल्यापासून दूर करत नाहीत. मंदिर परिसराच्या जवळील रामनगर तांडा येथे एका खोलीत ते राहतात. त्यांना दोन मुले, सूना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले हे वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी रोख रक्कम ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जवळची सगळी जमा पुंजी गायब झाल्याने त्यांनी रडतच पोलीस ठाणे गाठले. नाईकवाडे रडत असल्याचे पाहून शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने या चोरीचा छडा लावायचा असा निर्धार केला. नाईकवाडे यांना सोबत घेत ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते याची पाहणी  केली.

रामनगर तांडा येथे जाऊन पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांचे पथक परिसरात आल्याचे पाहुन तेथील नागरिक चक्रावून गेले. चोरीचा पोलिसांनी शोध घेतला असता तेथून काही किलोमीटर अंतरावर  एक पिशवी आढळून आली. ही पिशवी पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणली. त्यातील विस्कटलेल्या नोटा व्यवस्थित करून त्याचे बंडल बांधले. नोटा लावण्यास व मोजण्यास पोलिसांना एक तास लागला...तेव्हा पिशवीत १ लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम  सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्या हस्ते नाईकवाडे यांना सुपूर्द करण्यात आली. परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक जे.बी. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलिस जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुट्टे ,गोविंद भताने यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका वृद्धाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य तराळले.

टॅग्स :BeedबीडMONEYपैसाPoliceपोलिस