शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुळे शेतीच्या सुपिकतेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, ...

अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपिकतेला धोका पोहचत आहे. त्यामुळे शेतकºयांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्राहकांची लूट

अंबाजोगाई : शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांमधून सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. ग्राहकसेवा केंद्राकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात बँकांनी दक्षता बाळगावी व ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.

आधारलिंक बंधनकारक

अंबाजोगाई : स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने सर्व नगर परिषद तसेच नगर पंचायतींना शासनाकडून आधार फिडिंगचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक अर्जदाराच्या अर्जासोबत आधार लिंकिंग करण्यात आले आहे. शासनाने ही अट घातल्याने आधार लिंकिंगसाठी आधार केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.

नुकसानीचे पंचनामे नाहीत

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे शेतक-यांच्या गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज व विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा व ज्वारी भिजल्याने ज्वारी काळी पडू लागली आहे. तर हरभरा डागील झाला आहे. गहाचे पीकही पांढरे पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्या वतीने अद्यापही पंचनामे नाहीत. पंचनामे करावे. अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.

रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षात रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.