शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

परळी तालुका कोरोनामुक्तीकडे;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

परळी शून्य : ग्रामीण भागातील संख्याही चार परळी : कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आटोक्यात आली असून, बीड जिल्ह्यातील ...

परळी शून्य : ग्रामीण भागातील संख्याही चार

परळी : कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आटोक्यात आली असून, बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. परळी शहर बीड जिल्ह्यातील पहिले कोरोनामुक्त शहर बनले असून, आज शहरात शून्य, तर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारवर येऊन ठेपल्याने लवकरच परळी तालुकाही कोरोनामुक्त होईल, असे दिसत आहे.

मेच्या शेवटच्या आठवड्यात परळी तालुक्यातील वाढता रुग्णवाढीचा आलेख कमी होण्यास सुरुवात झाली होती. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन पुरवठा, कोविड सेंटरला आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनीही कोविड सेंटरच्या माध्यमातून तसेच आवश्यक बाबींवर शासनाकडे पाठपुरावा केला.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस, भाजप, शिवसेना आदी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, डाॅक्टर, परिचारिका, परळी नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस, सर्व शिक्षक, नगरपालिका कर्मचारी, पत्रकार यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. अनेक पत्रकारांनी सकारात्मक बातम्या, लेख प्रकाशित करून जनतेच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्याचे काम केले.

तालुक्यातील जनतेनेही शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून शासनास सहकार्य केले. त्यामुळे परळी तालुक्यात कोरोना आटोक्यात येण्यास फार मोठी मदत झाली आहे. यापुढेही जनतेने नियमांचे पालन केल्यास कोरोनाची कोणतीही लाट तालुक्यात शिरकाव करू शकणार नाही. आज शहरात रुग्णसंख्या शून्य आहे, तर ग्रामीण भागातील संख्या चार आहे. तीसुद्धा लवकरच शून्यावर येईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते रानबा गायकवाड यांनी व्यक्त केला.