केज (जि. बीड): केज तालुक्यातील शिंदी आणि गप्पेवाडी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास रानडुकरांच्या कळपाने शेतकऱ्यांवर भीषण हल्ला चढवला. नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना अचानक आलेल्या या कळपाने झडप घातल्याने शेतकऱ्यांना बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात ६ शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.
जखमींची नावे आणि उपचार:
१. उत्तम बाबू केदार: (प्रकृती गंभीर - बीड जिल्हा रुग्णालय)
२. अश्रूबा राजाभाऊ देशमुख व पंचफुला दिगंबर जाधव: (स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई)
३. ज्ञानेश्वर बापू पोते: (ग्रामीण रुग्णालय, केज)
४. चंद्रसिंग सखाराम पोते व फुलचंद मोहन पोते: (प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा)
नेत्यांची धाव आणि वनविभागाचा निषेध
घटनेची माहिती मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि ॲड. शरद इंगळे यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. "वनविभागाने आता तरी जागे व्हावे आणि या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करून जखमींना आर्थिक मदत मिळवून द्यावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
Web Summary : A sudden wild boar attack in Shindi and Gappewadi, Beed, injured six farmers working in their fields. The injured are receiving treatment at various hospitals. Local leaders demand action from the forest department and financial aid for the victims.
Web Summary : बीड के शिंदी और गप्पेवाड़ी में जंगली सूअरों के अचानक हमले में खेतों में काम कर रहे छह किसान घायल हो गए। घायलों का विभिन्न अस्पतालों में इलाज चल रहा है। स्थानीय नेताओं ने वन विभाग से कार्रवाई और पीड़ितों के लिए वित्तीय सहायता की मांग की है।