शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सांडवा फोडण्यावर अधिकारी ठाम, ग्रामस्थांचा मात्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

धारूर : आरणवाडी साठवण तलावानजीक एमएसआरडीने केलेला पर्यायी रस्ता पाण्यात जात असल्याने पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी साठा कमी ...

धारूर : आरणवाडी साठवण तलावानजीक एमएसआरडीने केलेला पर्यायी रस्ता पाण्यात जात असल्याने पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी साठा कमी करण्यासाठी सांडवा फोडण्याचे ठरविले. मात्र, या तलावाखालील पाच गावच्या लोकांनी विरोध केला. इतर पर्यायी मार्ग काढून पाणी कमी करावे, मात्र सांडवा फोडू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, शनिवारी या तलावास महसूल व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र निर्णय होऊ शकला नाही.

अनेक वर्षांपासून रखडलेला आरणवाडी साठवण तलाव यावर्षी तब्बल सतरा वर्षांनंतर पूर्ण झाला. या तलावात यंदा चांगल्या पावसामुळे ९० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला. तलावाच्या बाजूने खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्गाचा पर्यायी रस्ता करण्यात आला. मात्र हे काम एमएसआरडीने संथगतीने व अर्धवट केले. उंचीही वाढवली नाही. दरम्यान, तलावात पाणी साठा वाढल्याचे लक्षात आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावात ८५ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा ठेवणे धोकादायक असल्यामुळे सांडवा फोडण्याचा घाट घातला. मात्र, त्यास चोरांबा, आरणवाडी, थेटेगव्हाण, ढगेवाडी, पहाडीपारगाव येथील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे शनिवारी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वंदना शिडोळकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे, उपअभियंता हत्ते, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी तलावावर जाऊन परिस्थिती पाहिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, बालासाहेब चव्हाण, सदाशिव शिनगारे, भागवत शिनगारे, लहू फुटाणे, बंजरंग माने, सुरेश अंडील आदींसह नागरिक उपस्थित होते.

एमएसआरडी अभियंत्याची तहसीलदारांना अरेरावी

तलावाचा सांडवा फोडण्याच्या हालचाली सुरू असताना शनिवारी सकाळी तहसीलदारांनी तलाव आणि रस्ता कामाची पाहणी केली. त्यानंतर एमएसआरडीच्या उप अभियंत्यांना चौकशीसाठी फोन केला असता त्यांनी तहसीलदारांशी उद्धट वर्तणूक केली. या प्रकरणी पाहणी अहवाल व नागरिकांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

जलसमाधी घेऊ, पण सांडवा फोडू देणार नाही

आरणवाडी साठवण तलावाच्या शेजारील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाकण्यासाठी सांडवा फोडण्याचा घाट घातला जात आहे. या परिसराचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. सांडवा फोडणे गरजेचे नाही. प्रसंगी जलसमाधी घेऊ पण आम्ही सांडवा फोडू देणार नाहीत, असे चोरांबा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण म्हणाले.