शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हा रुग्णालयातच म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

बीड : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर आतापर्यंत अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया केल्या जात होत्या; परंतु आता यापुढे जिल्हा रुग्णालयातच शस्त्रक्रिया ...

बीड : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर आतापर्यंत अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया केल्या जात होत्या; परंतु आता यापुढे जिल्हा रुग्णालयातच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी तीन खाजगी डॉक्टरांची मदत घेतली आहे. तसेच सरकारी डॉक्टरही यासाठी सज्ज आहेत. शस्त्रक्रियागृहासह ओपीडी आणि स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला आहे. बुधवारी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी बैठकही घेतली.

जिल्ह्यात दिवसेंदिवस म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. सध्याही रुग्णसंख्या दीडशेपार गेली आहे. या सर्व रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात होत्या; परंतु ही सुविधा बीड जिल्हा रुग्णालयात उपलब्ध व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी प्रस्ताव तयार केला होता. याला डॉ.साबळे यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयात दंत व कान, नाक व घसा असे तज्ज्ञ नसल्याने खाजगी डॉक्टरांची मदत घेतली असून, त्यांना शस्त्रक्रियेनुसार मानधन दिले जाणार आहे. तसेच या रुग्णांचे निदानही बीडमध्येच होणार आहे. जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी जुना प्रसूती वॉर्डमध्ये ३० खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच फिव्हर क्लिनिकमध्येच ओपीडी तयार केली आहे. येथे संशय वाटल्यास तो वॉर्डात पाठविला जाणार आहे. यामुळे जिल्हावासीयांना समाधान मिळाले आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांसोबत सीएसची बैठक

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी म्युकरमायकोसिससंदर्भाने बुधवारी दुपारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, समन्वयक डॉ.अशोक हुबेकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सचिन आंधळकर आदींची उपस्थिती होती.

ही टीम करणार म्युकरमायकोसिसवर काम

डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक हुबेकर, डॉ. अभिषेक जाधव, डॉ.चंद्रकांत वाघ, डॉ.मीनाक्षी साळुंके, डॉ.रेवडकर, डॉ.अर्जुन तांदळे, डॉ.संतोष जैन, डॉ.जयश्री बांगर, डॉ.सबा, डॉ.अजय राख, जयश्री उबाळे, पळशीकर, तानाजी ठाकर, उज्ज्वला गावडे, रूपाली सुलाखे ही टीम म्युकरमायकोसिसचे काम पाहणार आहे. डॉ.सचिन चोले, डॉ.सुधाकर बीडकर आणि डॉ.अशोक उनवणे हे खाजगी डॉक्टर मदतीला असणार आहेत.

--

म्युकरमायकोसिससंदर्भात बैठक झाली आहे. गुरुवारपासून प्रत्यक्ष उपचार आणि शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. सर्व यंत्रणा आणि वैद्यकीय तज्ज्ञ तयार आहेत. लवकरच पहिली शस्त्रक्रिया होईल.

डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

===Photopath===

160621\16_2_bed_8_16062021_14.jpeg~160621\16_2_bed_7_16062021_14.jpeg

===Caption===

जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया गृह सज्ज झाले आहे.~जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी म्युकरमायकोसिस संदर्भात अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्रूांची बैठक घेतली.