शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत रुजविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST

कडा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावांत संघटित होऊन स्वत:ची ताकद निर्माण करून पक्षाची ध्येयधोरणे तळगळापर्यंत रुजविण्याची गरज ...

कडा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावांत संघटित होऊन स्वत:ची ताकद निर्माण करून पक्षाची ध्येयधोरणे तळगळापर्यंत रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रासपचे मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे यांनी केले.

कडा येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीत धायगुडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे मराठवाडा सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे, जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, तालुकाध्यक्ष गंगा खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. धायगुडे म्हणाले, रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपा व इतर कुठल्याच पक्षाच्या पाठीमागे न धावता गावागावांत संघटित होऊन स्वत:ची ताकद निर्माण करणे काळाची गरज आहे. यापुढे जिल्हा परिषद असो की, पंचायत समिती, कुठल्याही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डाॅ. शेंडगे म्हणाले, समाजातील उपेक्षितांना अपेक्षित स्थान मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक आहे. रासप नेते जानकर यांनी दुग्धविकासमंत्री असताना राज्यात पशूंची जनगणना केली. मात्र, केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही ओबीसींची जनगणना होत नसल्याची खंत आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संघटित होण्याची गरज आहे, असे सांगितले.

याप्रसंगी किरण तागड, रघुनाथ जगताप, नाथा वाघमोडे, धुळाजी लकडे, डाॅ. छगन दातीर, बाजीराव गोफणे, रफिक पठाण, राजेंद्र गावडे, अनिल देवकर, सय्यद ताजुद्दीन, भानुदास दातीर, दीपक देवकर, बाळासाहेब पारखे, राजू पालवे, सागर पारखे, महादेव पालवे, संतोष पारखे, राजू पालवे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक किरण तागड यांनी केले, सूत्रसंचालन अमर शेख यांनी तर आभार गंगा खेडकर यांनी मानले.

210821\img-20210819-wa0100_14.jpg

राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीत  रासपचे मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे, डॉ. शिवाजी शेंडगे यांचा पदाधिका-यांनी सत्कार केला.