शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

वैमनस्यातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:13 IST

जुन्या वादाच्या कारणावरुन एकाला धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी नवीन नागझरी (ता. गेवराई) परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड / गेवराई : जुन्या वादाच्या कारणावरुन एकाला धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी नवीन नागझरी (ता. गेवराई) परिसरात घडली. जिल्हा रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर रुग्णालय चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली.संजय काकासाहेब चव्हाण (वय २० वर्ष रा. नवीन नागझरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. नागझरी येथील वडार गल्लीत संजय हा शनिवारी दुपारी जखमी अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, त्याच ठिकाणी त्याची बहीण पाणी आणण्यासाठी गेली होती. तिने संजयला पाहिल्यानंतर काय झाले असे विचारले. चौघांनी धारदार शस्त्राने पोटात व छातीत वार केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्या बहिणीने हा सर्व प्रकार घरी सांगितला. त्यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गेवराई पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व संजयला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.त्याच्यावर त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वाटेतच संजयचा मृत्यू झाला होता. त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन मयत घोषित करण्यात आले. मात्र, ‘आता तर बोलत होता, मेला कसा’ असे म्हणत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरातच गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी वाढली होती. घटनेची माहिती पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत पाहणी केली.संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर गेवराईचे पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड, पोलीस उप निरीक्षक शिंदे व इतर पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी पंचनामा केला असून नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत.यामध्ये संशयित आरोपी म्हणून नारायण भारत पवार, पप्पू भारत पवार, आगलाव्या पवार, सरस्वती पवार, रोहिणी चव्हाण, संगीता उर्फ नॅशनल पवार, शिवकन्या पवार, सीमा पप्पू पवार, सोनी जावेद चव्हाण, गोट्या पवार, नवनाथ काळे व इतर काही जणांची नोंद करण्यात आली आहे.नागझरी पुन्हा हादरलीपाच महिन्यापुर्वी ४ एप्रिल रोजी येथे याच ठिकाणी एकाच समाजातील दोन गटात जुन्या वादातून आमनेसामने भिडले होते. यावेळी झालेल्या तलवारबाजीत उत्तरेश्वर भारत पवार (वय २० वर्षे ) हा तरुण जागीच ठार झाला होता तर त्याचा मोठा भाऊ नारायण भारत पवार (वय २६ वर्षे) हा गंभीर जखमी झाला. याच घटनेचा राग मनात धरुन शनिवारी संजयवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल