शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

खरीप पीकविम्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:01 AM

गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देबीडमध्ये कंपनी कार्यालयासमोर आंदोलन : धारूरमध्ये सोयाबीनसाठी रास्ता रोको

बीड/धारूर : गतवर्षी भरलेला खरिपाचा पीकविमा सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने बीडमधील ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी कंपनीविरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.गेवराई तालुक्यातील शेतकºयांनी खरिपाचा विमा भरला. निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रेही जोडली. विमा मंजुरही झाला. मात्र, अद्यापही तो शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला नाही. याबाबत वारंवार कृषी विभाग व ओरियन्टल इन्शुरंन्स कंपनीकडे वारंवार विचारणा केली. परंतु कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी गुरूवारी सकाळी बीडमधील कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन कंपनीचे शाखाधिकारी मिलींद ताकपेरे यांना देण्यात आले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या प्रश्नी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्वरित कारवाई करून शेतकºयांना विनाविलंब पीक विमा रक्कम अदा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.सोयाबीन पीकविम्यासह विविध मागण्या : धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोकोधारूर : जिल्ह्यातील उर्वरित शेतकºयांना सोयाबीनचा पीक विमा तात्काळ वाटप करावा, परळी -अंबाजोगाई रस्ता लवकर पूर्ण करावा, वैद्यनाथ कारखान्याच्या शेतकºयांचे ऊस बिल तात्काळ अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी परळी येथे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ठिय्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील शिवाजी महाराज चौकात रास्ता आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांतर्फे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, सुरेश फावडे, न.प. गटनेते सुधीर शिनगारे, ग्रा.पं. सदस्य कैलास बोरगावकर, प्रदीप नेहरकर, सखाराम सिरसट, श्रीकृष्ण सिरसट, अशोक सिरसट, गणेश डापकर, कैलास चव्हाण, बालाजी गांधले, विठ्ठल काळे,भागवत शिनगारे, राहुल चव्हाण, नेताजी सोळंके, बाबूराव गायकवाड, भाऊसाहेब बांगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. दोन्ही बाजंूची वाहतूक या आंदोलनामुळे काही काळ ठप्प झाली होती.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagitationआंदोलन