शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST

बीड : बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत बोरवन वस्तीवर जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याने वस्तीवरील ग्रामस्थांना ...

बीड : बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत बोरवन वस्तीवर जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याने वस्तीवरील ग्रामस्थांना जीव धोक्यात टाकून बिंदूसरा नदी ओलांडून पायपीट करावी लागते. हा रस्ता करून ग्रामस्थांना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी बोरवन वस्ती येथील राम बहीरवाळ यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी राजेंद्र मस्के बोरवन वस्ती येथे गेले होते. रस्ता नसल्यामुळे मोटारसायकलवरून बिंदूसरा नदीतून मार्ग काढत त्यांनी वस्ती गाठली. यावेळी गावकऱ्यांनी रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले. अडीचशे ते तीनशे लोकसंख्या असलेली ही वस्ती. रस्ता नसल्यामुळे येथील वयोवृद्ध गावकरी शाळकरी मुले व महिलांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात हालअपेष्टा जास्त सहन कराव्या लागतात. तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी मोठे संकट उभे राहते. पायपीट करून आणि नदी ओलांडल्याशिवाय वस्तीवरून ये-जा करता येत नाही.

लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील लोकांच्या गरजेनुसार अनेक छोट्या-मोठ्या रस्त्यांना प्राधान्य देऊन रस्त्याची कामे राजेंद्र मस्के यांनी पूर्ण केली आहेत. बीड वरवटी-भाळवणी-लिंबागणेश हा रस्ता पूर्ण केल्याने डोंगरपट्यातील साधारण पंधरा गावांना वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ता उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील ग्रामस्थ समाधानी आहेत. याच पद्धतीने बोरवन वस्ती रस्त्याची समस्या राजेंद्र मस्के यांनी सोडवावी, अशी भावना लोकांनी व्यक्त केली.

साधारण एक किलोमीटर लांबीचा हा रस्ता केवळ पाठपुरावा नसल्याने दुर्लक्षित राहिला आहे. येथील गावकऱ्यांची समस्या पूर्ण करण्यासाठी आपण जिल्हा परिषद अथवा शासनाच्या इतर योजनेत हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी गावकऱ्यांना दिला आहे. यावेळी राम बहीरवाळ, शाहदेव महाराज बहीरवाळ, त्रिंबक नैराळे, राधा किसन कदम, रवींद्र कळसाने, रामदास कदम, गजानन बहीरवाळ, महेश बहीरवाळ, बद्रिनाथ जटाळ आदि उपस्थित होते.

200821\063520_2_bed_24_20082021_14.jpeg

मांडवजाळी- बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे साकडे