शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आ. सुरेश धसांच्या भूमिकेपुढे प्रशासन नरमले; २९ मार्चपासून आष्टी तालुक्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 13:41 IST

lockdown in Beed : जिथे रुग्ण आहेत तिथे कडक निर्बंध लावा. परंतु, संपूर्ण तालुका लाॅकडाऊन करु नका.

ठळक मुद्देतालुक्यातील लॉकडाऊन दि.२९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे

- अविनाश कदम

आष्टी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिर्णयाचा विरोध करत आ. सुरेध धस व्यापाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात दुकाने सुरू ठेवली. १० दिवसांचा लाॅकडाऊन मान्य नसून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खायची तयारी असल्याची आक्रमक भूमिका आ. धस यांनी घेतली. यामुळे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत तातडीने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात झालेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लॉकडाऊन २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल असे जाहीर केले. 

बीड जिल्ह्यामध्ये मागिल काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. याच्या विरोधात तालुक्यातील व्यापा-यांनी आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार राजाभाऊ कदम यांना गुरुवारी ( दि.२५ ) निवेदन दिले होते. यावेळी आ.धस यांनी जिथे रुग्ण आहेत तिथे कडक निर्बंध लावा. परंतु, संपूर्ण तालुका लाॅकडाऊन करु नका. यामुळे सर्वसामान्य भरडला जाईल अशी भूमिका घेतली. आज सकाळी विरोध करत आ. सुरेध धस व्यापाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात दुकाने सुरू ठेवली. दरम्यान, दुपारी १२ वाजता या विषयी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

यानंतर झालेल्या निर्णयानुसार तालुक्यातील लॉकडाऊन दि.२९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र आ. धस यांना देण्यात आले. या बैठकीत उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसिलदार राजाभाऊ कदम, डिवायएसपी विजय लगारे, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, मुख्यकार्यकारी अधिकारी निता अंधारे उपस्थित होते. त्यानंतर आष्टी शहर पूर्णपणे बंद करण्यात आले. पोलिस प्रशासनाने शहरात पथसंचलन करून नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. 

पोलिसांच्या लाठ्या खाण्याची तयारी आष्टी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांचे दुकाने ९  ते १ या वेळेत सर्व सुरु ठेवण्याची परवानगी द्या. अन्यथा उद्यापासून सर्वच दुकाने तीन दिवसांसाठी बंद करा. पोलीसांच्या लाठ्या खाण्याची आमची तयारी आहे. १० दिवसांचा लाॅकडाऊन आम्हाला मान्य नाही.- आ. सुरेश धस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडSuresh Dhasसुरेश धस