शिरूर न्यायालयात कायदेविषयक जनजागरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:14+5:302021-06-24T04:23:14+5:30

प्रत्येक नागरिकाला कायद्यांची प्राथमिक ओळख व्हावी व प्रत्येक योजना त्याच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने कायदेविषयक जनजागरण शिबिराचे आयोजन केले होते. ...

Legal Awareness Camp at Shirur Court | शिरूर न्यायालयात कायदेविषयक जनजागरण शिबिर

शिरूर न्यायालयात कायदेविषयक जनजागरण शिबिर

प्रत्येक नागरिकाला कायद्यांची प्राथमिक ओळख व्हावी व प्रत्येक योजना त्याच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने कायदेविषयक जनजागरण शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना नियमावलीचे पालन करून शिबिर पार पडले. यावेळी न्यायमूर्ती मनगिरे, ॲड. प्रल्हाद ढाकणे यांनी कायदेविषयक माहिती दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर वकील संघाचे अध्यक्ष प्रल्हाद ढाकणे, सरकारी वकील संतोष माने, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, ॲड. आर. एम. नागरगोजे, ॲड. बापूराव बडे, एस. डी. जावळे उपस्थित होते. ॲड. भारत जायभाये यांनी प्रास्ताविक केले. ॲड. बी. बी. खेडकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी ॲड. एच. एस. कोठुळे, ॲड. प्रमोद कातखडे, ॲड. अमृता परदेशी / पठाण, ॲड. विश्वास बडे, ॲड. एम. डी. बारगजे, ॲड. निंबाळकर, न्यायालयाचे सहायक अधीक्षक पी. डी. क्षीरसागर, शरद माने, प्रकाश गवळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल काझी यांच्यासह पक्षकारांची उपस्थिती होती.

===Photopath===

230621\img-20210623-wa0002.jpg

===Caption===

जनजागृती

Web Title: Legal Awareness Camp at Shirur Court