शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण, नातेवाइकांनी केला कोविड योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

शेख मुस्तफा लोकमत न्यूज नेटवर्क लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व निवारण व मानसिक आजार ...

शेख मुस्तफा

लोकमत न्यूज नेटवर्क

लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व निवारण व मानसिक आजार उपकेंद्र आणि स्त्री रुग्णालयात आत्तापर्यंत कोविड केअर सेंटर सुरू होते. या संकटकाळात ‘घराबाहेर पडतो आणि आव्हानाला भिडतो’ अशी सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पंचक्रोशीतील श्रीपतरायवाडी ग्रामपंचायत, बरे होऊन गेलेले रुग्ण आणि नातेवाइकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमात वृद्धत्व निवारण व मानसिक आजार उपकेंद्र आणि स्त्री-रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत चव्हाण आणि डॉ. अरुणा केंद्रे, नोडल ऑफिसर डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, हॉस्पिटल मॅनेजर डॉ. इम्रान अली, डॉ. सायली पवार, लॅब टेक्निशियन विनायक शिरसट, रुक्‍मीण भोसले, प्रीती यादव, ईसीजी टेक्निशिअन सुनील जाधव, इन्चार्ज परिचारिका शोभाकला कावळे, शेरखाने, सय्यद यांच्यासह डॉक्टर्स, सर्व नर्स स्टाफ, डी ई ओ, वॉर्डबॉय, क्लार्क यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाबद्दल श्रीपतरायवाडीचे सरपंच सूर्यकांतराव माने, शेख तय्यब, मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी माजी सरपंच राजाभाऊ माने, बसवेश्वर आप्पा नांगरे, अमीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, विजय मुळे, संदिपान माने, मुकुंद तारळकर, ओमकार माने यांच्यासह बरेच रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

---------

दृष्टिक्षेपात सेंटर

उपचार घेणारे पॉझिटिव्ह रुग्ण ९७०२

सेंटर क्र.१ मधील रुग्ण - ४१०८

सेंटर क्र. २ मधील रुग्ण - ५५९४

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ९५५६

नोंदलेले मृत्यू - १४६

----------

सेवायज्ञ सुरूच राहणार

कोरोना महामारीच्या संकटकाळात रुग्णांची सेवा केली, तशीच पुढेही करीत राहू. सोमवार (दि. २१)पासून एक सेंटर बंद करून बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. पंचक्रोशीतील रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण व स्त्री-रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आमचे सासरे, मोठे बंधू व परिवारातील सदस्य उपचारासाठी दाखल झाले. लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्व उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले. येथील डॉक्टर, सर्व स्टाफने अतोनात परिश्रम घेत रुग्णसेवा केली.

- सूर्यकांतराव माने, सरपंच, श्रीपतरायवाडी

सिटीस्कॅनमध्ये पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खासगी दवाखान्याऐवजी लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले. अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे व टीमने पाच ते सहा दिवसांत उपचार करून सुटी दिली. येथील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉयने दिलेली सेवा कौतुकास्पद आहे.

- शेख तय्यब हमीद, रुग्णाचे नातेवाईक, परळी वैजनाथ