शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

पार्किंगच्या वादातून आधी मारहाण, उपचार घेण्यास गेल्यानंतर रुग्णालयात पुन्हा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 2:25 PM

अंबाजोगाईच्या 'स्वाराती' रुग्णालयात राडा; याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अंबाजोगाई - गाडीची पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील पाटील चौकात दोन गटात वाद झाला. यातील जखमी तरुण उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात गेला असता तिथे अपघात विभागात त्याच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी १६ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.  

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर रविवारी (दि.२१) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अपघात विभागात बहुतांशी वेळेस अत्यवस्थ रुग्ण असतात. रविवारी देखील अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू होते. त्याच वेळी ही घटना झाली. हाणामारी करणाऱ्या तरुणांना अपघात विभाग सारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालू नये याचेही भान राहिले नाही. चक्क अपघात विभागात घुसून एकमेकांवर खुर्च्छा फेकत त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. प्रचंड दहशतीखाली रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचारी जीव मुठीत धरून हा धुडगूस पाहत होते. 

दरम्यान, या दोन गटातील वाद शहरातील पाटील चौकातून सुरु झाला होता. फेरोज अब्दुल सत्तर कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या अर्शान कुरेशी याचे पाटील चौकात साकेब पठाण आणि इतर सहा जणांसोबत गाडी पार्क करण्यावरून वाद झाला. या वादातून साकेबने एक किलो लोखंडी वजनमाप गमच्यामध्ये बांधून अर्शानला मारहाण केली. त्यामुळे फेरोजने अर्शानला घेऊन रात्री ८.१५ वाजता उपचारासाठी स्वाराती रुग्णालय गाठले. 

मात्र, यावेळी साकीब जहीर पठाण, जहागीरमिर पठाण, दौलत मिर पठाण, साहील पठाण, सोहल नाजखन मिरखान पठाण, साकेब पठाण, आफताब अखीब शेख, मुशरफ माजीद शेख, पठाण फरद्यीम मिरखान, कलीम नियामत पठाण, माज पठाण, फेरोज पठाण, इफाजत मिरखान पठाण, नदीम जलील शेख, शारुख मिरखान पठाण आणि अख्तरखान पठाण (सर्व रा. सदर बाजार, अंबाजोगाई) हे १६ जण लोखंडी रॉड, काठ्या घेऊन तिथे आले आणि फेरोज आणि त्यांच्या सोबत असलेले शाहबाज मुस्तफा कुरेशी, मोबीन मुख्तार कुरेशी, अकबर कुरेशी आणि आरशान कुरेशी यांना बेदम मारहाण सुरु केली. 

या मारहाणीत आरशान कुरेशी याच्या हाताला आणि अकबर कुरेशी यांच्या डोक्याला जबर इजा झाली. सदर फिर्यादीवरून सर्व १६ आरोपींवर कलम ३०७, ३२६, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०६,१३५ अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक कांबळे करत आहेत. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी