शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे मृत्यू, ६ लाख नुकसान भरपाई; अधिकारी,अभियंत्यांच्या पगारातून वसुली करा: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:41 IST

दाव्याच्या आठ आठवड्यांत द्यावी लागेल रक्कम

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई : रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे जीव गमवावा लागल्यास आता जबाबदारी टाळता येणार नाही. अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या वारसांना ६ लाख रुपये, तर अपघातात जखमी झालेल्यांना ५० हजार ते २.५ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही भरपाई कंत्राटदारांकडून आकारलेल्या दंडातून किंवा दोषी ठरलेले अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांच्या पगारातून वसूल केली जाणार आहे. न्यायालयाचा हा आदेश सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांना लागू राहणार आहे. यामुळे रस्त्यांच्या दर्जाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनाला आता थेट जबाबदार धरले जाणार आहे.

खड्ड्यांसाठी अधिकारी, कंत्राटदार जबाबदार :             रस्त्यांची योग्य देखभाल करण्याची आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणांची आहे. रस्त्यांवर खड्डे असणे किंवा मॅनहोल्स उघडे ठेवणे, हे निष्काळजीपणाचे लक्षण असून, यासाठी थेट संबंधित अभियंते, अधिकारी आणि रस्ते कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

खड्डे, मॅनहोल्समुळे मृत्यू झाल्यास भरपाईखड्डे, मॅनहोल्समुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकारच्या अपघातात नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना सहा लाख रुपये भरपाई तत्काळ देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

जखमींना ५० हजार ते अडीच लाखांपर्यंत मदत:अपघातात गंभीर दुखापतीच्या स्वरूपानुसार, जखमी व्यक्तींना किमान ५० हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त २.५ लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हायकोर्टाचा निकाल कोणत्या संस्थांसाठी लागू ?             हा निकाल महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदांवर लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांच्या देखभालीसाठी एकसमान जबाबदारी निश्चित झाली आहे.

दोषी कंत्राटदार, अभियंत्यांसह अधिकाऱ्यांच्या पगारातून वसुली             नुकसानभरपाईची रक्कम प्रथम कंत्राटदारांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतून दिली जाईल. चौकशी अंती दोषी आढळलेले संबंधित अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मासिक पगारातून किंवा ठेवीतून ही रक्कम वसूल करून घेतली जाईल.

दाव्याच्या आठ आठवड्यांत द्यावी लागेल रक्कम :             अपघातानंतर दाव्याची प्रक्रिया पूर्ण करून आठ आठवड्यांच्या आत नुकसानभरपाई देणे बंधनकारक असेल. उशीर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर वैयक्तिक दंडात्मक कारवाई होऊ शकते.

भरपाईची रक्कम ठरविण्यासाठी समिती            नुकसानभरपाईची नेमकी रक्कम किती असावी? हे ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक संस्थेमध्ये स्थापन केलेली समिती अपघाताचे स्वरूप, दुखापतीची तीव्रता आणि वैद्यकीय अहवालनुसार भरपाई निश्चित करेल.

निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाहीमुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आता रस्त्यांच्या कामात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने सर्व संबंधित अभियंते आणि कर्मचाऱ्यांना रस्ते दुरुस्ती आणि मॅनहोल्सचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.--- प्रियंका टोंगे,मुख्याधिकारी, नगरपरिषद, अंबाजोगाई.

English
हिंदी सारांश
Web Title : High Court: ₹6 Lakh Compensation for Death Due to Potholes

Web Summary : Mumbai High Court mandates ₹6 lakh compensation for pothole-related deaths, recoverable from negligent officials' salaries. Injured victims get ₹50,000 to ₹2.5 lakh. Municipalities, councils held accountable; negligence won't be tolerated. Claims must be settled in eight weeks.
टॅग्स :BeedबीडAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाPotholeखड्डे