शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

धारूरच्या शिक्षकांची मदत मोलाची ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

धारूर : तालुक्यातील शिक्षकांनी आठवड्यापूर्वी पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व शनिवारी चार मल्टिप्यारा माॅनिटर मशीन आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या. ...

धारूर

: तालुक्यातील शिक्षकांनी आठवड्यापूर्वी पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व शनिवारी चार मल्टिप्यारा माॅनिटर मशीन आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या. कोविड केअर सेंटरवर गरजू कोरोना रुग्णांसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शिक्षकांच्या या सहकार्यामुळे आरोग्य विभागास मोठे सहकार्य झाले असून, गंभीर रुग्णांना याची मोठी मदत होणार आहे.

धारूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी वरिष्ठांच्या आवाहनानुसार मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक दिवसाचे वेतन दिले. त्यानंतर कोविड संकट काळात आपल्या तालुक्यासाठी मदत कामी आली पाहिजे, या उद्देशाने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, विस्तार अधिकारी शिवाजी अंडील यांचे मार्गदर्शन घेतले. सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वेच्छा निधी संकल्पना तालुक्यात राबविली. यातून ४ लाख ३० हजार रुपयांचा निधी स्वेच्छेने जमा केला. या उपक्रमात तालुक्यातील काही खासगी विद्यालयाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. कोरोना संकट काळात तालुक्यातील गरजूंच्या उपयोगासाठी मदतनिधीतून खर्च करण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन बेड नसल्याने कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व मल्टि प्यारा माॅनिटर हे गंभीर रुग्णसाठी आवश्यक असणारे मशीन खरेदीचा निर्णय झाला पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व चार मल्टिप्यारा माॅनिटर देण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. कोविड संकटानंतरही ही उपकरणे उपयोगी पडावीत, या हेतूने ते देण्यात आले. शनिवारपासून गंभीर रुग्णांसाठी याचा वापरही प्रत्यक्ष सुरू झाला. या निधी संकलनासाठी आसेफ शेख, अर्जुन मुंडे, श्रीराम आपेट, शांतीनाथ मुंडे, विकास अडागळे, रत्नाकर डोंगरे, सुदर्शन काळे, सचिन कवडे, जनार्धन पालकर, अनुरथ मुळे, सुमंत सक्रांते, आदींनी परिश्रम घेतले. शिक्षकांचा हा उपक्रम समाजमनाला उभारी देणारा ठरला आहे.

===Photopath===

290521\img-20210529-wa0107_14.jpg~290521\img_20210529_141159_14.jpg