शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन दिवस एकच प्रकार! शिवाजी नगर भुयारी मार्गात हायवा अडकल्याने वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:48 IST

शिवाजी नगर भुयारी मार्गात सलग दुसऱ्या दिवशी हायवा अडकला; तासाभर वाहतूक ठप्प, नागरिक संतापले.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा-देवळाई परिसराला जोडणाऱ्या छत्रपती शिवाजी नगर भुयारी मार्गात शुक्रवारी रात्री १०:१० च्या सुमारास पुन्हा एकदा हायवा अडकल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळीही अशाच प्रकारे एक जड वाहन अडकले होते. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे भुयारी मार्गाच्या उंचीबाबत आणि अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत प्रशासकीय नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वाहतूक कोंडीचा विळखाशिवाजी नगरकडून देवळाई चौकाकडे जात असताना हा विना नंबर प्लेट असलेला हायवा बोगद्याच्या मध्यभागी अडकला. हायवा अडकल्याचे समजताच मागून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने मागे घेतली, मात्र काहींनी हायवा निघाल्याचा समजापोटी रिक्षा आणि चारचाकी आत घातल्या. यामुळे बोगद्यात दोन्ही बाजूने वाहने अडकून पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

टायरची हवा सोडली अन् रस्ता मोकळा झालाहायवा बाहेर निघणे अशक्य झाल्याने शेवटी चालकाने समोरील टायरमधील हवा सोडली. उंची थोडी कमी झाल्याने सुमारे अर्ध्या तासानंतर (रात्री १०:३० वाजता) हा हायवा बोगद्याबाहेर निघाला. सलग दोन दिवस अशा घटना घडत असल्याने, "हा भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी आहे की अडचणीसाठी?" असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांकडून विचारला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hiwa Truck Stuck Again in Shivaji Nagar Underpass, Traffic Jam!

Web Summary : For the second consecutive day, a Hiwa truck got stuck in the Shivaji Nagar underpass in Chhatrapati Sambhajinagar, causing a major traffic jam. This incident raises concerns about the underpass's height and the entry of heavy vehicles, prompting local residents to question its purpose.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर