पाणी साठे, गटारींमध्ये सोडले गप्पी मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:10+5:302021-07-25T04:28:10+5:30

किल्लेधारूर : धारूर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद व आरोग्य विभागाकडून संयुक्तपणे विविध उपाय केले जात ...

Guppy fish left in water reservoirs, gutters | पाणी साठे, गटारींमध्ये सोडले गप्पी मासे

पाणी साठे, गटारींमध्ये सोडले गप्पी मासे

किल्लेधारूर : धारूर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद व आरोग्य विभागाकडून संयुक्तपणे विविध उपाय केले जात ओत. शनिवारी शहरातील विविध भागांत पाणी साठे तसेच गटारींमध्ये गप्पी मासे मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले.

गप्पी मासे सोडल्यामुळे डासांचे निर्मूलन होणार आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने घरोघरी जाऊन सांडपाण्याच्या साठ्यात ॲबेटींग केले. तसेच प्रत्येक परिसासराची धुरळ्णी करण्यात आली. त्यानंतर गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी , मुख्याधिकारी नितीन बागुल, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,नगरसेवक संतोष बप्पा सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, सुरेश लोकरे, भाजपा शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. मोहन भोसले, ग्रामीण रुग्णालयाचे चंद्रकांत ठोबरे, बजरंग शिनगारे, श्रीकांत वडगावकर, मुन्ना ठाकूर यांच्यासह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.

240721\img_20210724_101255.jpg

धारूर शहरात नगरपरीषद व आरोग्य विभागाचे वतीने गप्पी मासे सोडताना

Web Title: Guppy fish left in water reservoirs, gutters