मराठवाड्याच्या विकासात गोविंदभाई श्रॉफ यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:18+5:302021-07-26T04:30:18+5:30

डी. के. देशमुख : माजलगावात अभिवादन सभा माजलगाव : मराठवाड्याच्या विकासात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे फार ...

Govindbhai Shroff's great contribution in the development of Marathwada | मराठवाड्याच्या विकासात गोविंदभाई श्रॉफ यांचे मोठे योगदान

मराठवाड्याच्या विकासात गोविंदभाई श्रॉफ यांचे मोठे योगदान

डी. के. देशमुख : माजलगावात अभिवादन सभा

माजलगाव

: मराठवाड्याच्या विकासात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे

फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मराठवाडा जनता विकास परिषदेचे मार्गदर्शक, माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख

यांनी केले.

हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील ज्येष्ठ सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा जनता

विकास परिषद, माजलगाव शाखेच्यावतीने आयोजित अभिवादन सभेत देशमुख बोलत होते. याप्रसंगी ॲड. आर.

डी. भिलेगावकर, आर. बी. देशमुख, ॲड. ए. एम. मोगरकर, सुहास देशमुख, शिरीष देशमुख, सुमंत

गायकवाड, प्रा. पी. के. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देशमुख म्हणाले की, मराठवाड्याच्या

विकास प्रश्नांसाठी श्रॉफ यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण व खादी या दोन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

त्याचबरोबर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना, औरंगाबाद रेल्वेचे ब्रॉडगेज आणण्यासाठी महत्त्वाची

प्रयत्न केले. परळी- बीड - नगर रेल्वे मार्गासाठीही त्यांनीच आग्रह धरला होता. यावेळी हिमांशू देशमुख, कैवल्य

देशमुख, गणेश मुळाटे, किरण देशमुख, राजाभाऊ शिवणकर, धोंडीराम रामुळे व भास्कर घाडगे यांची उपस्थिती होती.

अभिवादन सभेचे सूत्रसंचालन परिषदेचे जिल्हा सचिव सुमंत गायकवाड यांनी केले.

240721\2009purusttam karva_img-20210724-wa0031_14.jpg

Web Title: Govindbhai Shroff's great contribution in the development of Marathwada